आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काश्मीरमध्ये दहशतवाद्यांची नवी चाल, गर्दीच्या आडून फेकू लागले ग्रेनेड

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीनगर/नवी दिल्ली - हिज्बुल मुजाहिदीनचा कमांडर बुऱ्हान वणीच्या मृत्यूनंतर दहशतवाद्यांनी काश्मीरमध्ये हिंसाचारासाठी नवा फंडा शोधला आहे. गुप्तचर संस्थाच्या माहितीनुसार, दहशतवादी दगडफेक करणाऱ्या निदर्शकांच्या गर्दीत घुसून फोर्सेसवर ग्रेनेड फेकत आहेत. ग्रेनेड फुटल्यानंतर जमाव अनियंत्रित होतो. आत्मसंरक्षणासाठी जवानांना फायरिंग करावे लागते. वणीच्या मृत्यूनंतर 5 दिवसांमध्ये 500 पेक्षा जास्त चकमकी झाल्या आहेत. हिंसाचारात 33 लोक मारले गेले तर 1400 पेक्षा जास्त जखमी आहेत.
मोदी म्हणाले - वणीला हिरो करु नका
> पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे की बुऱ्हान वणीला हिरो करु नका. आफ्रिकेहून परतल्यानंतर बोलावलेल्या तातडीच्या बैठीक मोदींनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह, एनएसए अजीत डोभाल यांच्यासोबत चर्चा केली.

> चार आफ्रिकी देशांच्या दौऱ्यावरुन परतल्यानंतर मंगळवारी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काश्मीरमधील हिंसाचाराची माहिती घेण्यासाठी दिल्लीत वरिष्ठ पातळीवरील बैठक बोलावली होती.
> या बैठकीला राजनाथसिंह, सुषमा स्वराज, मनोहर पर्रीकर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल उपस्थित आहेत.
राजनाथ सिंहांनी अमेरिका दौरा केला रद्द
> या बैठकीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी रात्री गृहमंत्री राजनाथसिंह यांनी वरिष्ठ मंत्री आणि अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. त्यांनी अधिकाऱ्यांकडून सुरक्षेचा आढावा घेतला होता.
> सूत्रांच्या माहितीनुसार, सुरक्षा यंत्रणांना आंदोलकांना शांत करण्यासाठी सर्व उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
> राजनाथसिंह यांनी बोलावलेल्या बैठकीला पर्रीकर, अरुण जेटली, एनएसए डोभाल उपस्थित होते.
> आफ्रिकी दौऱ्यावर गेलेल्या मोदींनी दौरा संपण्याच्या 24 तास आधी एनएसए डोभाल यांना भारतात पाठवले होते.
> तसेच काश्मीरमधील बिघडत चाललेली परिस्थिती पाहाता राजनाथ सिंह यांनी त्यांचा अमेरिका दौरा रद्द केला आहे.

सीआरपीएफच्या 800 जवानांची तुकडी पाठवली
> पुलवामा येथे जमावाने एअरफोर्सच्या विमानतळावर दगडफेक करत आग लावण्याचा प्रयत्न केला होता.
> डूरु येथे कोर्ट बिल्डिंग आगीच्या भक्षस्थानी देण्यात आली. सोपोर येथे भाजी मंडीतील पोलिस चौकीला आग लावण्यात आली होती.
> लदयार आणि बुऱ्हानचे गाव त्रालमध्ये सीआरपीएफ कँप आणि शनिवारी अनंतनाग येथे अमरनाथ यात्रेकरुंच्या भांडाऱ्यावर हल्ला करण्यात आला होता.
> कर्फ्यू मुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सीआरपीएफच्या 800 जवानांना खोऱ्यात पाठवण्यात आले आहे.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, काय म्हणाले पाकिस्तान...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...