आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Terrorists Sent Threat Letter To Modi Govt, News In Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मोदी सरकारला दहशतवाद्यांचे पत्र; 33 देशांच्या वकीलाती उडवण्याची धमकी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- दहशतवादी संघटनेने पुन्हा एकदा मोदी सरकारला धमकी दिली आहे. दहशतवाद्यांनी मोदी सरकारला पत्र पाठवून दिल्लीतील 33 देशांच्या वकिलातींना उडवून देण्याची धमकी दिली आहे. मोदी सरकारसह सर्व वकिलातींना दहशवाद्यांनी धमकीचे पत्र पाठवले आहे. धमकीच्या पार्श्वभूमीवर सर्व वकिलातींच्या सुरक्षेत वाढ करण्‍यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी धमकी दिल्याने मोदी सरकारसमोर दिल्लीत असलेल्या 33 देशाच्या वकिलांतीच्या सुरक्षेचे नवे आव्हान उभे राहिले आहे. दहशतवाद्यांनी पाठवलेल्या एका पत्रात दिल्लीतील 30 वकीलाती बॉम्बने उडवून देण्याचा उल्लेख आहे. गुप्तचर संस्था 'आयबी'ने याबाबत चौकशी सुरु केली आहे. सर्व वकीलातींना आलेली पत्रे एकाच ठिकाणाहून आल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, आयबी याबाबत प्रचंड गोपनियता पाळत आहे.
दहशतवाद्यांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सर्व वक‍िलातींबाहेर सुरक्षा रक्षक तैनात केले आहेत. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी दिल्लीसह महाराष्ट्रात दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अलर्ट जारी करण्‍यात आले होते. याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीनंतर अफगानिस्तानात दहशतवाद्यांनी भारतीय वाणिज्य दूतावासावर हल्ला चढविला होता. मात्र, सुरक्षा रक्षकांनी दहशतवाद्यांचे मंसूबे यशस्वी होऊ दिले नव्हते.

या घटनेनंतर अल कायदाचा एक व्हिडिओ समोर आला होता. त्यात काश्मीरमध्ये दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देण्याबाबत म्हटले होते. दरम्यान, मोदी सरकारसमोर देशाच्या सर्वागिन विकासासह अंतर्गत आणि बाह्य सुरक्षेचेही मोठे आव्हान आहे. मोदी सरकार या आव्हानांचा कशाप्रकारे सामना करते, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.