आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Terrorists Use Harami Canel Way Enter In Gujarat

अतिरेक्यांचा हरामी नाल्याच्या मार्गे गुजरातमध्ये घुसखोरीचा डाव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - जम्मू - काश्मीरच्या सीमेवरून घुसखोरी करण्याचा दहशतवाद्यांचा डाव अयशस्वी होत आहे. त्यामुळे आता त्यांनी नवा मार्ग शोधला असून गुप्तचर यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार लष्कर-ए-तोयबाचे जवळपास १२ अतिरेकी हरामी नाल्याच्या मार्गे गुजरातमध्ये घुसखोरी करण्यासाठी सीमपलीकडे टपून बसले आहेत.

अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा यांच्या भारत दौ-याच्या आधी किंवा नंतर घुसखोरी होऊ शकते. त्यासाठी पाकिस्तानने बंदी घातलेल्या दहशतवादी संघटना जमात-उल-दावाचा प्रमुख हाफिज सईद सक्रिय झाला आहे. त्याला पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयचे कर्नल मन्सूर खान सक्रिय मदत करत असून लष्कराचे दहशतवादी केरळमध्ये कोचीच्या मार्गाने घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात आहेत, अशी गुप्तचर यंत्रणेची माहिती आहे.

कुठे आहे हरामी नाला?
कच्छमध्ये सरक्रिक हद्दीत हरामी नाला आहे. आठ किलोमीटरची ही जीवघेणी दलदल आहे. सुमारे ५०० किलोमीटरमध्ये ही दलदल विस्तारली आहे. पाकमधून त्याची सुरुवात होते. भारतीय हद्दीत २१ किलोमीटर वाहून हा नाला पाकिस्तानात प्रवेश करतो. या भागात बीएसएफने २०१२ मध्ये तुकड्या तैनात केल्या होत्या.

१२ अतिरेक्यांना प्रशिक्षण
लष्कर-ए-तोयबाकडे स्वत:ची नौदल तुकडी असल्याची खळबळजनक माहिती आहे. या तुकडीला मॉरिशसच्या सागरी भागावर प्रशिक्षण दिले जाते. या तुकडीतील १२ प्रशिक्षित दहशतवादी घुसखोरीच्या प्रयत्नात आहेत. त्यांच्याकडे पाकिस्तानी नौदलाशी साधर्म्य असणा-या नौकांमधून घुसखोरीचा त्यांचा डाव आहे. पकडले गेल्यास पाक नौदल त्या आपल्या असल्याचा इन्कार करू शकते.

घुसखोरीसाठी सुरक्षित नाला
आयएसआयला घुसखोरीसाठी हरामी नाला सुरक्षित वाटत आहे. नौका किंवा छोटे जहाज नाल्यात घुसले तर ते थेट भारतीय हद्दीत प्रवेश करते. परंतु पाकच्या बाजूने सरक्रिक व हरामी नाल्यातून पाक नौदलाची परवानगी घ्यावी लागते.