आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Terroritst Yasin Bhatkal Attempting To Break Hyderabad Jail

यासीन भटकळने बनवला तरुंगातून पळून जाण्याचा प्‍लॅन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली हैद्राबादमधील चेरलापल्लीच्‍या कारागृहात शिक्षा भोगत असलेला इंडियन मुजाहिदीनचा प्रमुख यासीन भटकळ हा तरुंगातून पळून जाण्‍याचा प्‍लॅन बनवत असल्‍याची धक्‍कादायक माहिती उघडकीस आली. या बाबत तीन आठवड़यांपूर्वी त्‍याने पत्‍नीसोबत मोबाइलवरून केलेल्‍या चर्चा केली. त्‍यासाठी त्‍याला सीरियातील आयएसचे सहकार्य मिळणार होते.

सहा महिन्‍यांपूर्वी कारागृहातील काही कैद्याजवळ मोबाइल फोन आढळून आले. त्‍यांच्‍याच मदतीने यासीनेन दिल्‍लीत राहणाऱया आपल्‍या पत्‍नीसोबत संपर्क करून लवकरच आपण बाहेर येणार असल्‍याचे सांगितले. सप्‍टेंबर 2013 मध्‍ये त्‍याला नेपाळ बॉर्डरवर पकडण्‍यात आले होते. त्‍यानंतर एक वर्ष दिल्लीच्‍या तिहाड कारागृहारात राहिल्‍यानंतर NIA ने त्‍यांला हैद्राबादच्‍या चेरलापल्ली जेलमध्‍ये पाठवण्‍याचा निर्णय घेतला. यासिन याने तीन आठवड़यात आठपेक्षा अधिक वेळा आपल्‍या पत्‍नीला फोन केला. या संभाषणातूनच पळून जाण्‍याची त्‍याची योजना समोर आली.