आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Test Firing Of Liquid Engine Of Isro\'s Mars Orbitor Today

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इंजिन चाचणी यशस्वी, दोन दिवसात इस्त्रोचे यान असेल मंगळ कक्षेत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली/बंगळुरू - भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्रो) मंगळयानाने सर्वात मोठा टप्पा पार करत मंगळ ग्रहाच्या कक्षेत प्रवेश करण्याच्या दिशेने मोठे यश प्राप्त केले आहे. नियोजित कार्यक्रमानुसार येत्या 24 सप्टेंबरला हे यान मंगळ ग्रहाच्या कक्षेत प्रवेश करणार आहे. गेल्या नऊ महिन्यांपासून बंद असलेले यानाचे द्रवरुप इंधन असलेले इंजिन सुरु करण्यात शास्त्रज्ञांना यश आले आहे. ही चाचणी यशस्वी झाली आहे.
सोमवारी मंगळयानाने मंगळाच्या गुरुत्वाकर्षण कक्षेत प्रवेश केला आहे. मंगळाच्या वातावरणात प्रवेश करताना त्याला अधिक शक्तीचा वापर करावा लागणार आहे. त्यासाठी गेल्या तीनशे दिवसांपासून निद्रिस्त असलेल्या इंजिनाची सोमवारी दुपारी 2.30 वाजता चाचणी घेतली गेली. चार सेकंदासाठी हे इंजिन सुरु करण्यात आले होते. यासंबंधीच्या डिजिटल कमांडस् यानाच्या यंत्रणेत नोंदवलेल्या असून यानाच्या यंत्रणेतील हालचालींचे काळजीपूर्वक निरीक्षण सुरू आहे.

यशाच्या क्षीतिजावर : गेल्यानोव्हेंबरला पीएसएलव्हीने उड्डाण घेतल्यानंतर भारतीय यान मंगळाच्या दिशेने रवाना झाले. या प्रवासात डिसेंबर 2013 रोजी पृथ्वीची कक्षा ओलांडताना यानावर असलेले द्रवरूप इंधन असलेले इंजिन सुरू करण्यात आले होते. त्यानंतर ते निद्रिस्त होते.

पुढील स्लाइडमध्ये, किती आला मोहिमेवर खर्च