आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

समुद्र, जमीन, हवेतून डागता येईल सुपरसॉनिक क्षेपणास्त्र; ब्रह्मोसची चाचणी यशस्वी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- भारतीय हवाई दलाने बुधवारी जगातील सर्वात वेगवान म्हणून आेळखल्या जाणाऱ्या ब्रह्माेस या सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राची सुखोई-३० या लढाऊ विमानातून यशस्वी चाचणी घेतली. या यशामुळे हवाई दलाच्या मारक क्षमतेत अनेक पटीने वाढ झाली आहे. या यशामुळे जमीन, हवा व सागरातून मारा करण्याची क्षमता असलेले सुपरसॉनिक क्षेपणास्त्र असलेला भारत पहिला देश ठरला आहे. ही यशस्वी चाचणी घेऊन भारताने जागतिक विक्रम प्रस्थापित केला असल्याचे संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण यांनी म्हटले आहे. सूत्रांनुसार, विंग कमांडर प्रशांत नायर व के. पी. किरणकुमार यांनी सुखोईतून ही चाचणी घेतली. स्क्वाड्रन लीडर अंगद प्रताप व ग्रुप कॅप्टन बद्रीश अत्रेय वैमानिक म्हणून जबाबदारी सांभाळत होते.


> 290 किमी मारक क्षमता
> 2.5 टन क्षेपणास्त्राचे वजन
> 2 टप्प्यात इंजिन कार्यरत
> 2.8 मॅक म्हणजे ध्वनीपेक्षा तिप्पट वेग


- सुखोईवर तैनात केले जाणारे हे सर्वात वजनदार अस्त्र.
- लाँचिंगसाठी एचएएलने सुखोई-३० मध्ये काही बदल केले.

 

ब्रह्मोस क्षेपणास्त्र सुखोई-३० विमानाच्या फ्युजलेसने डागण्यात आले. दोन टप्प्यात कार्यरत क्षेपणास्त्राचे इंजिन चालू झाले आणि त्याने लक्ष्याचा अचूक वेध घेतला.

बातम्या आणखी आहेत...