आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tharoor First Reaction On Tv After Sunanda Pushkar Death

\'सुनंदाला नाक दाबून रशियन विष पाजले होते\', भाजप नेत्याचा दावा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - 'माझ्या पत्नीच्या मृत्यूचा शोक देखील मला करता आला नाही. व्यक्तिगत आणि दःखद घटनेचेही राजकारण करण्याचा प्रयत्न झाला.' अशा शब्दात केंद्रीय राज्यमंत्री शशी थरुर यांनी पत्नी सुनंदा पुष्कर हिच्या मृत्यूनंतर प्रथमच त्यांची व्यथा मांडली आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीतून त्यांनी पत्नी वियोगाचे दुःख व्यक्त केले आहे.
दुसरीकडे, भारतीय जनता पक्षाचे (भाजप) नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्विट करुन सुनंदा पुष्कर यांची हत्या झाल्याचा दावा केला आहे. त्यांनी लिहिले आहे, की सुनंदाचे तोंड उघडे होते. तिच्या शरीरावर जखमा होत्या. तिला नाक दाबून रशियन विष देण्यात आले होते. दिल्लीतील लीला हॉटेलमध्ये सुनंद पुष्कर यांचा संशयास्पद मृत्यू झाला होता.
भाजप माझे दुःख समजू शकत नाही !
अतिशय कठीण परिस्थितून गेलेले थरुर म्हणाले, 'सार्वजनिकरित्या जे बोलले जात आहे, त्याचे वाईट वाटते. मात्र, जे झाले ते झाले. भाजपच्या लोकांना माझे दुःख कळणार नाही आणि सोशल मीडियाला माझ्या बद्दलचा न्याय-निवाडा करण्याचा कोणताही अधिकार नाही.'

थरुर यांच्या निशाण्यावर सुब्रमण्यम
थरुर यांचा आरोप आहे, की काही लोक त्यांच्या वैयक्तिक दुःखदायक घटनेचा राजकीय लाभ घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. सुब्रमण्यम स्वामी यांचे नाव घेऊन थरुर म्हणाले, सुनदांचा मृत्यू हत्या असल्याचे सांगून सुब्रमण्यम स्वामी राजकीय लाभ मिळविण्याचा प्रयत्न करीत आहेत. तसेच त्यांनी, स्वामी यांना पुरावे सादर करण्याचे आव्हान दिले आहे. ते म्हणाले, राजकारणात सुब्रमण्यम यांना कोणीच गांभीर्याने घेत नाही.
मृत्यूतपासाबाबत थरुर नाराज
सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूला पाच आठवडे उलटले असले तरी, त्यांच्या मृत्यूचे गुढ अजूनही कायम आहे. केवळ प्रकृती अस्वास्थ्य हेच मृत्यूचे कारण असल्याचा दावा थरुर यांनी केला आहे.
पोलिस तपासावर नाराजी व्यक्त करताना ते म्हणाले, केवळ आरोग्याच्या कारणामुळे सुनंदाचा मृत्यू झाला आहे. आता आणखी तपासाची खरेतर काही गरज नाही. मात्र पोलिस संथ गतीने तपास करीत आहे. त्यामुळे अनेक शंका उपस्थित होत आहेत.

पुढील स्लाइडमध्ये, सुब्रमण्यम यांचे ट्विट