कोलकाता/नवी दिल्ली -
सुनंदा पुष्कर यांच्या हत्येच्या तपासाने वेग घेतला असतानाच काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांची स्तुती केली आहे. लोकसभा निवडणुकीत त्यांनी माझे अभिनंदन करणे हे कौतुकास्पद होते. आमच्यात वाद झालेला असताना त्यांच्याकडून अशी अपेक्षा नव्हती, असे थरूर म्हणाले. दरम्यान, आगामी दोन दिवसांत या प्रकरणी थरूर यांची चौकशी होण्याची शक्यता आहे.
थरूर यांनी महिलांना अधिक प्रतिनिधीत्त्व देण्याबाबतही भाजपचे कौतुक केले आहे. यापूर्वी ते म्हणाले होते की, लोकसभा निवडणुकीत मोदींच्या विजयाने त्यांना तीन पुस्तकांच्या मालिकेतील अखेरचे पुस्तक लिहिण्याची प्रेरणा दिली आहे. कोलकाता लिटररी फेस्टीव्हलमध्ये त्यांचे पुस्तक 'इंडियोक्शन ऑन द नेशन इन आवर टाइम'लाँच सोहळ्यात ते मीडियाशी बोलत होते.
थरूर ज्या पुस्तकांबाबत बोलत होते, त्यातील दोन पुस्तके आली आहेत. त्यातील पहिल्या पुस्तकात देशाच्या स्वातंत्र्यलढ्याच्या 50 वर्षांची माहिती आहे. दुसरे पुस्तक स्वातंत्र्यानंतर साठच्या दशकातील झालेल्या बदलांबाबत आहेत. तर तिस-या आणि शेवटच्या पुस्तकात 60 ते 70-75 व्या वर्षादरम्यान झालेल्या परिवर्तनाबाबत त्यांना लिहायचे होते. पण आता हे पुस्तक मोडी-फिकेशन नावाने लवकरच येणार आहे.
स्वच्छता अभियानाचे कौतुक केल्याने गमावले प्रवक्ते पद
थरूर यांनी यापूर्वीही पंतप्रधानांच्या स्वच्छ भारत मोहिमेचे कौतुक केले आहे. तसेच स्वतः पंतप्रधानांनीही त्यांना हे अभियान पुढे नेण्यासाठी नॉमिनेट केले होते. पण याच मुद्यावर त्यांना पक्षाचे प्रवक्तेपद गमवावे लागले होते.
पुढे वाचा, एअर इंडियाच्या क्रू मेंबरची चौकशी