आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मिस वर्ल्डची खिल्ली महागात, थरूर यांना लवकरच समन्स; महिला आयोग कारवाई करणार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काँग्रेसचे वरिष्ठ नेते शशी थरूर यांनी ‘मिस वर्ल्ड’ मानुषी छिल्लरच्या नावाची ट्विटरवर खिल्ली उडवली. (संग्रहित फोटो) - Divya Marathi
काँग्रेसचे वरिष्ठ नेते शशी थरूर यांनी ‘मिस वर्ल्ड’ मानुषी छिल्लरच्या नावाची ट्विटरवर खिल्ली उडवली. (संग्रहित फोटो)

नवी दिल्ली- काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांना मिस वर्ल्ड २०१७ चा किताब पटकावणाऱ्या मानुषी छिल्लरची खिल्ली उडवणे चांगलेच महागात पडले आहे. छिल्लरचा अपमान झाला असून थरूर यांनी माफी मागावी, असे राष्ट्रीय महिला आयोगाने म्हटले आहे. ट्विटर युजर्सकडूनही नाराजी व्यक्त झाल्यानंतर थरूर यांनी नंतर खेद व्यक्त केला व कोणाला दुखावण्याचा हेतू नव्हता, असे त्यांंनी म्हटले.


मानुषीची मिस वर्ल्ड म्हणून निवड झाल्यानंतर थरूर यांनी छिल्लरचा संदर्भ देत ‘नोटबंदी करणे किती मोठी चूक होती. आता भाजपला जाणीव झाली असावी. कारण भारताची रोकडही जगावर प्रभाव टाकणारी आहे. आपली चिल्लरही मिस वर्ल्ड बनली आहे,’ अशा आशयाचे विधान त्यांनी केले होते.


त्यावर राष्ट्रीय महिला आयोगाने थरूर यांना चांगलेच पट्ट्यावर घेतले. आम्ही थरूर यांच्या विधानाचा निषेध करत आहोत. त्यांनी हरियाणा व देशाच्या मुलीच्या कामगिरीचा अपमान केला आहे. तिने देशाला गौरव प्राप्त करून दिला. अशा मुलीला चिल्लर म्हणणे योग्य होईल का ? त्यांनी तत्काळ माफी मागावी. थरूर यांना समन्स पाठवले जाईल. तुमची पातळी एवढी खाली का घसरत आहे, असा सवाल एफटीआयआयचे अध्यक्ष अनुपम खेर यांनी विचारला आहे. अनेक ट्विटर युजर्सनी थरूर यांच्यावर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली.

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...