आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • That Is Why Modi Want\'s To Change The System Of Railway

...जेव्हा मोदींनी स्वतःची बर्थ महिलेला दिली आणि रेल्वेत खाली झोपले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतीय रेल्वेला अत्याधुनिक सेवा - सुविधांनी सज्ज करण्याबद्दल बोलत असतात. लोकसभेच्या प्रचारादरम्यान त्यांनी देशात बुलेट ट्रेन धावतील असे स्वप्न दाखवले आहे. तसेच ते रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षीततेचा दावा करतात. मोदींनी स्वतः रेल्वेचा अनेकवेळा प्रवास केला आहे. भारतीय रेल्वेच्या सेवा-सुविधांचा त्यांनी स्वतः 'अनुभव' घेतलेला आहे. यासंबंधीचा 1990 मधील रेल्वे प्रवासाचा एक किस्सा त्यांच्यासोबत प्रवास करणार्‍या एका महिलेने 1995 मध्ये लिहिला होता. हा किस्सा लिहिणार्‍या लिना शर्मा आता रेल्वेच्या माहिती तंत्रज्ञान विभागात जनरल मॅनेजर पदावर कार्यरत आहेत. त्यांच्या दोन रात्रींच्या रेल्वे प्रवासाचा हा अनुभव त्यांनी साध्या सरळ शब्दात मांडला आहे. या प्रवासात त्यांना गुजरातचे दोन नेते भेटले होते. त्यांनी कशी मदत केली आणि रेल्वेत कसा त्रास होऊ शकतो. हे स्पष्ट करणारे हे अनुभव कथन आहे.
पहिल्या रात्रीचा प्रवास
लिना शर्मा लिहितात, 'ही 1990 च्या उन्हाळ्यातील गोष्ट आहे. भारतीय रेल्वे सेवेत दाखल झाल्यानंतर ट्रेनिंगसाठी चालले होते. मी ज्या बोगीत होते तिथे दोन मंत्री आणि दोन खासदार होते. ते त्यांच्या कामात व्यस्त होते. मात्र, बोगीतील इतर 12 प्रवाशांचे वर्तन काही ठिक नव्हते. त्यांच्यापैकी एकाचेही तिकीट आरक्षीत नव्हते. असे असतानाही त्या बोगीतील प्रवाशांना बळजबरीने जागेवरुन उठवून त्यांचे सीट बळकवण्याचा त्यांचा प्रयत्न होता. ते सर्व 12 जण गुंड प्रवृत्तीचेच दिसत होते. ते आमच्या बॅगवर बसून नको त्या कॉमेंट्स पास करत होते. त्यांचा रागही येत होता आणि भीतीही वाटत होती. त्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांसोबतची ती रात्र अतिशय भयावह होती. आम्हाला त्यांचा प्रचंड राग येत होता. ती बाब आता आमच्या सन्मान आणि आत्मसन्मानाशी जोडली गेली होती. तो त्रासिक प्रवास दुसर्‍या दिवशी सकाळी दिल्लीला पोहोचल्यानंतर संपला. त्या रात्रीच्या अनुभवाने माझी सहकारी अतिशय भयभीत झाली होती. पुढील ट्रेनिंग अहमदाबादला होती. मात्र, तिथे जाण्याचे टाळत तिने दिल्लीला परत जाण्याचा विचार केला होता. मात्र, तरीही आम्ही मध्य रात्री अहमदाबाद (गुजरातची राजधानी) साठी रेल्वे पकडली. '
पुढील स्लाइडमध्ये वाचा, भाजपच्या दोन नेत्यांनी केली मदत
छायाचित्र - उधमपुर-कटरा दरम्यान धावणार्‍या पहल्या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवताना पंतप्रधान नरेंद्र मोदी.