आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

254 फोटो पाहून ओळखले ‘ते’ दोन जवान; रक्षाबंधनावेळी छेडछाड करणारे दोघे निलंबित

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दंतेवाडा / नकुलनार- छत्तीसगडच्या बस्तर येेथील निवासी कन्या  विद्यालयाच्या विद्यार्थिनींसोबत अश्लील चाळे करणाऱ्या दोन जवानांची ओळख पटली आहे. या दोघांनाही निलंबित करण्यात आले असून एकास अटक करण्यात आली, तर दुसरा जवान उत्तराखंडला पळून गेला आहे. या विद्यार्थिनींनी २५४ जवानांची छायाचित्रे आणि व्हिडिओ फुटेज तपासल्यानंतर दोन्ही आरोपींना ओळखले.  

जवानांची नावे २३१ बटालियनचे शमीम अहमद आणि नीरज खंडेलवाल अशी आहेत. शमीमला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. त्यानंतर त्याची तुरुंगात रवानगी करण्यात आली, तर ३ ऑगस्ट रोजी सुटीवर गेलेल्या नीरज खंडेलवाल यास पकडण्यासाठी पोलिसांचे पथक उत्तराखंडला गेले आहे. तीन दिवस चाललेल्या नाट्यमय घडामोडीत  सीआरएफच्या चौकशी पथकाने १८ विद्यार्थिनींना २५४ जवानांची छायाचित्रे दाखवली होती. त्यांचे व्हिडिओ फुटेजही पाहिले. त्यानंतर या आरोपींची ओळख पटली.  

बाल आयोगाकडून दखल 
या प्रकरणाची बाल आयोगाने दखल घेतली आहे. आयोगाचे सदस्य यशवंत जैन यांनी पोलिस अधीक्षकांना यासंदर्भात लवकरात लवकर अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. जवानांच्या अशा लज्जास्पद कृत्यानंतर राज्यात संतापाची लाट उसळली असून, या जवानांवर कठोर कारवाई करण्याची मागणी महिला वर्गातून होत आहे. शाळेच्या प्रशासनावरही पालकवर्गातून नाराजी व्यक्त होत आहे. 

कारवाईत उशीर झाल्याने प्रशासनाची सारवासारव  
विद्यार्थिनींशी असभ्य वर्तन घडून आठवडा उलटला. आता प्रशासनास जाग आली. घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, सीआरपीएफचे डीआयजी आदींनी अधीक्षिका आणि जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांशी चर्चा केली. प्रकरण संवेदनशील असल्याने तपासास उशीर लागला, असे प्रशासनाचे म्हणणे होते.  
बातम्या आणखी आहेत...