आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IAF प्रमुख म्हणाले- काट्या सारखा सलतो PoK, ...तर पीआेके भारताचे असते

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- भारताने तत्वांना धरून बसण्याची गरज नव्हती. उच्च नैतिक मूल्यांच्या जागी लष्करी पर्याय निवडला असता तर अाजच्या घडीला पीआेके भारताचा भाग झाला असता, अशा शब्दांत हवाई दल प्रमुख अरूप राहा यांनी इशारा दिला आहे. दुसरीकडे १९७१ पर्यंत भारताने हवाई दलाच्या संपूर्ण ताकदीचा वापर केला नसल्याबद्दलही त्यांनी खेद व्यक्त केला.

१९६२ १९६५ मध्ये राजकीय कारणांनी आम्ही हवाई दलाचा संपूर्णपणे वापर करू शकलो नव्हतो. राहा तीन महिन्यांनंतर निवृत्त होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर एका संमेलनात त्यांनी भारताच्या भूतकाळातील सरकारी धोरणे परराष्ट्र धोरणांचा आपल्या भाषणातून उल्लेख केला. राहा पहिल्यांदाच धोरणांबद्दल एवढ्या स्पष्टपणे जाहीर बोलले आहेत. पाकिस्तानच्या ताब्यातील काश्मिर आमच्या शरीरात काट्यासारखा बोचू लागला आहे.

ते म्हणाले, आमच्या परराष्ट्र धोरणाचा उल्लेख संयुक्त राष्ट्राच्या घटनेत गटनिरपेक्ष आंदोलन पंचशिल सिद्धांताच्या रूपाने आढळून येतो. आपण अतिशय उच्च मूल्ये असलेल्या वाटेवर चालत आहोत. परंतु सुरक्षेच्या गरजा लक्षात घेऊन काहीतरी व्यावहारिक उपाययोजना स्वीकारली पाहिजे.

आपण कधीही व्यावहारिक उपाययोजनेची अंमलबजावणी केेलेली नाही. आपण खूप पलिकडे गेलो आहोत. त्या ठिकाणी लष्कराच्या शक्तीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले आहे, असे सूचकपणे त्यांनी सांगितले.
पुढील स्लाइड्सवर वाचा, आणखी काय म्हणाले हवाई दल प्रमुख राहा... आणि परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप
बातम्या आणखी आहेत...