आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • The Age Of Sexual Consent Should Be 16 Yrs In India

‘संबंधां’चे वय घटवण्यावर विरोध झुगारून सहमती

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - खासदार व देशवासीयांच्या भावनांचा विचार न करता सरकारने अखेर निर्णय घेतलाच. अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिगटाने बुधवारी शरीरसंबंधांचे वय 18 वरून 16 करण्याला सहमतीने मंजुरी दिली.

मंत्रिगटाने अंतिम स्वरूप दिलेल्या मसुद्यात ‘लैंगिक शोषण’च्या जागेवर ‘बलात्कार’ असा शब्द वापरला जाईल. महिलांचा पिच्छा करणे, चोरून लपून पाहणेही अजामीनपात्र गुन्हा ठरवला आहे. एखाद्या महिलेची तक्रार चुकीची असल्याचे सिद्ध झाले तरी तिच्यावर कारवाई होणार नाही. मसुदा गुरुवारी कॅबिनेटसमोर व तेथे पारित झाल्यानंतर 18 रोजी सर्वपक्षीय बैठकीत मांडला जाईल. नंतर संसदेत मांडला जाईल. विधेयकासाठी 22 मार्चपर्यंत वेळ आहे. मंत्रिगटातील अश्विनीकुमार, कृष्णा तीरथ व कपिल सिब्बल यांच्यासह 80 खासदारही निर्णयाच्या विरोधात होते.