आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली - अत्याचाराविरुद्ध कठोर कायदा करण्याच्या नावाखाली केंद्राने परस्पर संमतीने शारीरिक संबंधाचे वय घटवून 16 वर्षे करण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली 20 मिनिटे चाललेल्या बैठकीत केंद्रीय मंत्रिमंडळाने गुरुवारी विधेयकाला 5 मिनिटातच मंजुरी दिली. चिदंबरम यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिगटाच्या सर्व शिफारशी कॅबिनेटने स्वीकारल्या.
हा कायदा लागू झाल्यास सहमतीने शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याचे वय 18 ऐवजी 16 वर्षे होईल. विधेयकाचे भवितव्य विरोधी पक्षांवर अवलंबून आहे. सर्वपक्षीय बैठक 18 मार्च रोजी होणार असून सरकारलाही याच दिवशी विधेयक संसदेत मांडायचे आहे. मात्र सरकारमध्येच विरोधाचा सूर आहे.
बहुतांश खासदार, पक्ष मुख्यमंत्री वय घटवण्याविरुद्ध
काँग्रेस
ज्या 55 खासदारांना ‘दिव्य मराठी’चा प्रश्न केला, त्यापैकी 43 जणांनी विरोध दर्शवला, अनेक मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री विरोधात
भाजप
शिवराजसिंह, रमनसिंह यांच्यासह चार राज्यांचे मुख्यमंत्री विरोधात
सुषमा, राजनाथ बोलले : संसदेत आमची भूमिका मांडू
यूपीए घटक पक्ष
सपा आणि बसप म्हणाले, विधेयक समाजाच्या विरोधात
लालू गप्प । मात्र झारखंड राजद अध्यक्ष म्हणाले- आमचा विरोधच
इतर पक्ष
झामुमोचे शिबू सोरेन म्हणाले, विधेयकाला कडाडून विरोध करणार
जदयू म्हणणे मांडणार, अनेक छोट्या पक्षांसह 90 खासदार विरोधात
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.