आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • The Arvind Kejriwal Led Aam Aadmi Party (AAP) Government Will Table Its First Budget In The Delhi Assembly Today

DELHI BUDGET: एकाच कार्डवर बस-मेट्रो प्रवास, शिक्षणावर सर्वाधिक भर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिल्ली विधानसभेत अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री मनीष सिसोदिया - Divya Marathi
दिल्ली विधानसभेत अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री मनीष सिसोदिया
नवी दिल्ली - दिल्लीतील आम आदमी पक्षाच्या सरकारने गुरुवारी विधानसभेत पहिला संपूर्ण अर्थसंकल्प मांडला. या अर्थसंकल्पात शिक्षण आणि आरोग्य या दोन बाबींवर सर्वाधिक भर देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, दिल्लीत आता लवकरच बस किंवा मेट्रो वाहतुकीसाठी ‘कॉमन कार्ड’ पद्धती आणली जाणार आहे. त्यानुसार, प्रवाशी एकाच तिकिट किंवा कार्डच्या माध्यमातून मेट्रो किंवा बसमधून प्रवास करू शकतील. सोबतच, नागरिकांसाठी ‘हेल्थ कार्ड’ बनवले जातील. दिल्लीतील रुग्णालयांमध्ये १० हजार बेडची व्यवस्था केली जाणार आहे.

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदीया यांनी हा अर्थसंकल्प सादर केला. २०१५-१६ वर्षासाठी आरोग्य क्षेत्रासाठी या अर्थसंकल्पात ४ हजार ७८७ रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. अर्थसंकल्पात गरीबांसाठी सवलती देण्यात आल्या असल्या तरी काही चैनीच्या वस्तूंवरील करात मात्र वाढ करण्यात आली आहे. अर्थसंकल्प तयार करण्यासाठी प्रथमच सरकारने जनतेची मते मागवली आहे. भाषणाच्या सुरुवातीलाच सिसोदिया यांनी जनतेने अर्थसंकल्पाच्या प्रक्रियेत सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद दिले. १५०० पेक्षा जास्त नागरिकांनी यासाठी मते नोंदवली.
अर्थसंकल्पातील महत्त्वाचे मुद्दे
शिक्षण
>> पहिल्या टप्प्यात सर्व महाविद्यालय आणि ग्रामीण दिल्लीला वाय-फाय झोन केले जाईल. 50 कोटीची तरतूद करण्यात आली.
>> शिक्षण विभागासाठी 9836 कोटींची तरतूद. मागील सरकारच्या शिक्षणावरील खर्चाच्या बजेटच्या तुलनेत 106% जास्त आहे.
>> 50 शाळांना मॉडेल स्कूल बनवले जाणार.
>> दोन वर्षांमध्ये दिल्लीला पूर्ण साक्षर करण्याचे लक्ष्य.
>> दिल्लीतील सर्व सरकारी शाळांमधील वर्ग खोल्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार.
>> 20 हजार शालेय शिक्षकांची भरती करणार.
>> 10+2 उत्तीर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना दोन प्रमाणपत्र देण्याची योजना. एक नियमीत शिक्षणाचे आणि दुसरे कौशल्य अभ्यासक्राचे प्रमाणपत्र असेल.
>> दिल्लीत तीन नवीन आयटीआय आणि पाच नवीन तंत्रशिक्षण (पॉलिटेक्निक) महाविद्यालये सुरु करणार.
>> शिक्षणात कौशल्य विकास आणि व्यवसायिक अभ्यासक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी 2015-16 च्या अर्थसंकल्पामध्ये जवळपास 310 कोटींची तरतूद.
बातम्या आणखी आहेत...