आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • The Bharat Ratna Medal That Will Be Presented To Sachin Tendulkar

सचिन तेंडुलकर भारतरत्नने सन्मानित, 14 वर्षांपूर्वी तयार झाले होते मेडल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि ज्येष्ठ शास्त्रज्ञ प्रो. सी.एन.आर.राव यांना आज भारतरत्नने सन्मानित केले गेले आहे. सचिनला दिले जाणारे भारतरत्नचे पदक हे 2000 मध्ये तयार केले गेले होते. त्याच वर्षी सचिनने भारतीय क्रिकेट संघाच्या कर्णधार पदाचा राजीनामा दिला होता. सचिनला दिले जाणारे पदक कोलकाताच्या अलिपूर टाकसाळीत ठेवण्यात आले होते, तिथे त्याची पॉलिश केल्यानंतर गेल्या आठवड्यात गृहमंत्रालयाकडे पाठविण्यात आले आहे. सचिनला भारतरत्न देण्याचा निर्णय 16 नोव्हेंबर 2013 रोजी घेण्यात आला होता.
14 वर्षांपूर्वी तयार झाले आहे पदक
सचिनला आज दिले जाणारे भारतरत्नचे पदक हे 14 वर्षांपूर्वी तयार करण्यात आले होते. या पदकाची पॉलिश आणि स्वच्छता करुन ते गृहमंत्रालयाला सुपूर्द करण्यात आले आहे. कोलकाताच्या अलिपूर टाकसाळीला दोन पदक पाठवण्याचा आदेश देण्यात आला होता.

पुढील स्लाइडमध्ये जाणून घ्या, कोण आहेत प्रो. सी.एन.आर.राव