आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • The BJP Government On Thursday Issued Orders To Cancel The Bungalows Allotted By The UPA.

लालूंचा शासकीय बंगला जाणार, कॉंग्रेसला रिकामे करावे लागेल कार्यालय?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्‍ली- कॉंग्रेस अध्‍यक्षा सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वढेरा यांच्या व्हीव्हीआयपी सुविधा काढून घेतल्या जाणार असल्याचे मोदी सरकारने संकेत दिले आहे. दुसरीकडे, संसदेतील कॉंग्रेसचे कार्यालयही धोक्यात सापडले आहे. तसेच कॉंग्रेसच्या नेतृत्त्वातील यूपीए सरकारतर्फे नेत्यांना वितरीत करण्‍यात आलेल्या बंगल्यांची परवानगीही रद्द करण्‍याचे मोदी सरकारने आदेश दिले आहेत.

यूपीए सरकारने निवडणुकीच्या काळात आदर्श आचारसंहितेकडे कानाडोळा करून कॉंग्रेससह आरजेडी आणि समाजवादी पक्षांच्या नेत्यांना देण्यात आलेल्या बंगल्याची परवानगी कायम ठेवली होती. मात्र, आता मोदी सरकारने या बंगल्याची परवानगी रद्द केली आहे. त्यात लालू प्रसाद यादव यांच्या बंगल्यासह नॅशनल अॅडव्हायझरी काउंसिलच्या कार्यालयाचा समावेश आहे.

कॉंग्रेसलाही रिकामे करावे लागेल कार्यालय?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात 282 जागा जिंकून लोकसभेत पोहोचलेल्या भाजपला आता मोठ्या कार्यालयाची गरज भासत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने लोकसभेच्या सेक्रेटरी जनरल यांच्याकडून माहिती घेतली जात आहे. पक्षाच्या गरजेनुसार संसदेत मोठे चेंबर उपलब्ध करून दिले जाऊ शकते. भाजपसह एआयएडीएमके, तृणमूल आणि बीजेडीच्या सदस्यांची संख्या लक्षात घेता. त्यांनाही मोठ्या चेंबरची गरज असेल. या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसला धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत 44 जागा मिळाल्या. त्यामुळे कॉंग्रेसला इतके मोठे कार्यालय रिकामे करावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. सन 1980 च्या दशकापासून संसदेतील सगळ्यात मोठे चेंबर ‍कॉंग्रेसच्याच ताब्यात आहे.