आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माझ्या ठिकाणी सोनिया गांधी असत्या तर त्यांनी काय केले असते, सुषमांचा सवाल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - काँग्रेसच्या 25 खासदारांच्या निलंबनाविरोधात पक्षाचे खासदार तिसऱ्या दिवशी देखील संसदेबाहेर धरणे देत आहेत. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी नुकत्याच झालेल्या नागा शांतता करारावर प्रश्न उपस्थित केला आहे. तर, परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी त्यांच्यावर लावण्यात आलेल्या आरोपांना लोकसभेत उत्तर दिले. ललित मोदीला मदत केली नाही तर त्याच्या पत्नीच्या उपचारांसाठी मदत केली, माझ्या ठिकाणी सोनिया गांधी असत्या तर त्यांनी काय केले असते, असा उलट सवाल त्यांनी उपस्थित केला. यावेळी काँग्रेसचे सदस्य सभागृहात नव्हते.
दुसरीकडे, गुरुवारी देखील राज्यसभेत काँग्रेस खासदारांचे निलंबन आणि सुषमा स्वराजांच्या राजीनाम्यावरुन गोंधळ उडाला आणि दुपारी 12 पर्यंत सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले.

तर, लोकसभेत दुपारी 12 नंतर परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी निवदेन केले. त्यांनी त्यांच्या बचावाचे अनेक तर्क आपल्या भाषणातून मांडले आणि ललित मोदीला मदत ही मानवतेच्या आधारातूनच केली याचा पुनरुच्चार केला. ती मदत ललित मोदीला नाही तर, त्याची पत्नी, जी भारतीय नागरिक आहे तिला केली होती, असेही त्यांनी स्पष्ट केले. माझ्या ठिकाणी जर सोनिया गांधी असत्या तर त्यांनी काय केले असते, असा सवाल करत त्यांनी स्वतःचा बचाव केला. सुषमा स्वराज यांनी पुढील आठवड्यापासून तरी 'ललितगेट'वर चर्चा होईल अशी अपेक्षा व्यक्त केली. माझे ग्रह चांगले नाहीत, ते लवकरच चांगल्या स्थितीत येतील असेही त्या म्हणाल्या. (सुषमा स्वराज यांचे संपूर्ण निवेदन वाचा पुढील स्लाइडवर)

येचूरी म्हणाले, मग चौकशीला नकार का ?
सुषमा स्वराज यांच्या वक्तव्यानंतर सीपीएम नेते सीताराम येचूरी म्हणाले, 'जर त्यांना वाटते की काहीही चूकीचे केलेले नाही तर मग चौकशीला सामोरे जाण्यास का तयार नाही ? आजपर्यंत कोणी तरी झालेले आरोप स्विकार केलेले आहेत का ? चौकशी झाली पाहिजे आणि तोपर्यंत सुषमा स्वराज यांनी पदावरुन दूर झाले पाहिजे.'
कसे उघड झाले प्रकरण
ब्रिटनमधील 'द संडे टाइम्स' या वृत्तपत्राने 14 जून रोजी प्रकाशित केलेल्या वृत्तानंतर देशात मोठा वाद सुरु झाला. टाइम्समध्ये प्रकाशित वृत्तानूसार, जुलै 2014 मध्ये ललित मोदीने त्याची पत्नी मीनल मोदीवरील कॅन्सर ऑपरेशनपूर्वी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्याशी संपर्क केला होता. ललित मोदीला ब्रिटनमधून बाहेर जाण्याची परवानगी नाकारण्यात आली होती. सुषमा स्वराज यांनी ब्रिटनमधील भारतीय वंशाचे खासदार कीथ वाज यांना फोन करुन मोदीला जर ट्रॅव्हल डॉक्यूमेंट्स दिले गेले तर त्याचा भारत-ब्रिटनच्या संबंधावर परिणाम होणार नाही, असे सांगितले होते. सुषमा स्वराज यांनी मोदीला ट्रॅव्हल डॉक्यूमेंटसाठी केलेल्या या मदतीमुळे केंद्र सरकार बॅकफूटवर आली. एक वर्षे ज्या सरकारवर एकाही घोटाळ्याचा डाग लागला नव्हता त्यांना सुषमा स्वराज यांच्यावरील आरोपाने विरोधकांच्या टीकेचा सामना करावा लागत आहे.

पुढील स्लाइडमध्ये सविस्तर वाचा, काय म्हणाल्या सुषमा स्वराज