आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • The Congress Party’S Real Plan B: Lose The Election, Defeat BJP

पराभूत झाल्यानंतरही मोदींना रोखण्यासाठी काँग्रेसचा \'प्लॅन बी\'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - देशातील सर्वात जूना आणि मोठा पक्ष असलेल्या काँग्रेसने आगामी लोकसभा निवडणुकीनंतर विजयाचा दावा केला आहे. मात्र काँग्रेसमधील दिग्गज नेत्यांना ग्राउंड रियालिटीची पूर्ण जाणीव आहे. विविध जनमत चाचण्या आणि सर्व्हेक्षणातून लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसचे संख्याबळ कमकूवत होणार आहे, असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. अशा परिस्थितीचा सामना करण्यासाठी काँग्रेसही सज्ज झाली आहे. काँग्रेसला सत्तेसाठीचे अपेक्षीत संख्याबळ मिळाले नाही तर काय करायचे यासाठी पक्षाचे काही नेते 'प्लॅन बी'च्या तयारीला लागले आहेत.
'प्लॅन बी'नुसार नरेंद्र मोदी आणि एनडीए आघाडीला सत्तेपासून दूर ठेवण्याची तयारी काँग्रेस करीत आहे. काँग्रेस उपाध्यक्ष आणि काही नेते हा पक्षांतर्गत प्लॅन तयार करीत आहेत. यानुसार काँग्रेसला बहुमत मिळाले नाही तर, एखाद्या तिस-या आघाडीला पाठिंबा देऊन सत्ताधारी बनवायचे अशी तयारी सुरू आहे. दरम्यानच्या काळात काँग्रेस पुन्हा जोमाने प्रचाराला लागणार आणि देशात पक्षाची स्थिती भक्कम करुन मध्यावधी निवडणुकीची परिस्थिती निर्माण करण्याची शक्यता आहे.
जानेवारी महिन्यात झालेल्या अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या (एआयसीसी) बैठकीत राहुल गांधी यांनी 'प्लॅन बी'चे संकेत दिले होते. देशभरातून आलेल्या कार्यकर्त्यांना उद्देशून राहुल म्हणाले होते, की NRMB अर्थात NOT RICH, NOT MIDDLE CLASS OR NOT BPL असे देशात 70 कोटी लोक आहेत. मात्र, त्यांच्याकडे कोणाचे लक्ष नाही. जर हा वर्ग काँग्रेसचा मतदार झाला तर सर्वसाधारण निवडणूकीत विजयी होणे सर्वात सोपे आहे. मात्र, या वर्गाला मतदार बनविण्यासाठी पक्षाला अधिक वेळेची गरज आहे.

पुढील स्लाइडमध्ये, काँग्रेस पराभूत झाली तरी किंगमेकर