आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झोपडपट्टी तोडफोड: राहुल गांधी म्हणजे बालक, केजरीवाल यांचा घणाघात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शकूरबस्तीतील मृत्यू प्रकरणी आंदोलन करताना काँग्रेस - Divya Marathi
शकूरबस्तीतील मृत्यू प्रकरणी आंदोलन करताना काँग्रेस
नवी दिल्ली - राजधानी दिल्लीत रेल्वेने राबविलेल्या अतिक्रमणविरोधी मोहिमेत शकूरबस्ती भागात एका ६ महिन्यांच्या मुलीचा मृत्यू झाल्यावरून केजरीवाल सरकारने संसदेत आणि संसदेबाहेर सरकारला लक्ष्य केले आहे. यादरम्यान "आप'च्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर पलटवार करत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी राहुल गांधी बालक आहेत, रेल्वे केंद्र सरकारच्या अंतर्गत येते हे त्यांना कुणी सांगितले नसावे, अशी टीका केली. दरम्यान रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी मुलीचा मृत्यू पाडापाडीआधी झाल्याचे सांगत रेल्वेवरील आरोप फेटाळले आहेत.

आम आदमी पार्टी आणि तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी रेल्वेच्या अतिक्रमणविरोधी मोहिमेचा निषेध करत संसद परिसरात महात्मा गांधीजींच्या पुतळ्याजवळ निदर्शने केली. आपच्या खासदारांनी लोकसभेत हा मुद्दा उपस्थित केला. लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी यावरील स्थगन प्रस्ताव फेटाळून लावला. राहुल गांधी यांनी घटनास्थळाला भेट दिल्यानंतर भाजप आणि आप सरकारवर टीका केली. त्यावर प्रतिक्रिया देत आपचे प्रवक्ते आशुतोष यांनी राहुल यांच्या वक्तव्यातून लोकसभेत काँग्रेसचा पराभव का झाला हे समजून येईल,असे सांगितले. शकुरबस्तीमध्ये जाण्याचा मुहूर्त त्यांना नेमका आताच कसा सापडला, अशी विचारणा आपने केली.
अमानवी कारवाई : उच्च न्यायालय
उच्च न्यायालयाने दिल्ली सरकार, दिल्ली पोलिस आणि रेल्वेला नोटीस पाठवली आहे. त्यांना १६ डिसेंबरपर्यंत उत्तर देण्यास सांगितले आहे. एवढेच नव्हे तर रेल्वेचे महाव्यवस्थापक आणि दिल्ली पोलिस आयुक्तांनी कारवाई करण्याआधी आवश्यक पावले उचलण्याची माहिती न्यायालयाला प्रतिज्ञापत्राद्वारे देण्याचे आदेश त्यांनी दिले. हा गंभीर मुद्दा आहे. लोकांच्या जिवाचा प्रश्न आहे. ही खूप अमानवीय कारवाई होती. आपण आधीच्या चुकातून काही सुधारणा केल्या नाहीत.

पोलिसांकडून गुन्हा दाखल
मुलीचे आई-वडील झोपडपट्टीतून बाहेर पडण्यासाठी आवराआवर करत होते. यादरम्यान कपड्यांचा गठ्ठा लहान मुलीच्या अंगावर पडून श्वास गुदमरल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. दोन दिवसांनंतर निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याचा गुन्हा सोमवारी दाखल करण्यात आला.
आपचे राजकारण : सतीश उपाध्याय
आप सरकार मुलीच्या मृत्यूवरून विनाकारण राजकारण करत असून ही दिल्लीची संस्कृती नसल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष सतीश उपाध्याय यांनी केजरीवाल यांना प्रत्युत्तर देताना सांगितले. टीव्ही वाहिन्यांवर लोकांचा हितचिंतक असल्याचे दाखवण्याचा केजरीवाल
यांचा सोपा मार्ग आहे.
बातम्या आणखी आहेत...