आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाऊस १५ % कमी, उत्पादन २० % घटणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - खरीप हंगामात यंदा गेल्या वर्षीपेक्षा १६ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर पेरणी झाली आहे, तरीही कमी पावसामुळे यंदा १५ ते २० टक्क्यांपर्यंत उत्पादन घटण्याची चिन्हे आहेत. मात्र, कृषी विभागाचा अंदाज ५.५ टक्केच उत्पादन होईल, असा आहे. १ जून ते १८ सप्टेंबरपर्यंत ७०५.८ मि.मी. पाऊस झाला. साधारणत: तो सरासरीपेक्षा १५ टक्के कमी आहे. जून-जुलैत चांगल्या पावसामुळे पेरणीक्षेत्र तर वाढले आणि ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये कमी पावसामुळे नुकसान झाले. यामुळे प्रति हेक्टर उत्पादन कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कमी पावसाचा उत्पादनावर परिणाम
कृषितज्ञ देवेंद्र शर्मा यांच्या मते, १६ टक्के कमी पाऊस झाल्याने खरिपात सामान्यत: १५ ते २० टक्के कमी उत्पादन होऊ शकते. धान, सोयाबीन, ऊस, मका आणि कापूस यांचे नुकसान होण्याची जास्त शक्यता आहे. हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान आणि आंध्र प्रदेश-तेलंगणसारख्या राज्यांत कमी पाऊस आहे.
धान्याच्या भावावर परिणाम
तूर आणि उडीद डाळींचे भाव स्वातंत्र्यानंतर प्रथमच सर्वोच्च किमतीवर पोहोचले आहेत. तूरडाळीचे भाव डिसंेंबरपर्यंत तेजीतच राहतील, असा अंदाज आहे. तोपर्यंत म्यानमारमधून नवी डाळ येईल. उडीद व अन्य डाळींच्या भावांत नीचांक लवकरच दिसेल. आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलांच्या किमती उतरलेल्या आहेत. किमतींमध्ये हंगामानुसार वाढ होईल.
थंडीच्या मोसमावर होणार परिणाम
स्थिती स्पष्ट नाही, पण जर यानंतर पाऊस झाला नाही तर या वेळी १५ ते २० दिवसांच्या अंतरानेे थंडीचा मोसम उशीरा सुरू होऊ शकतो, तर स्कायमेटचे उपाध्यक्ष व्ही.पी. शर्मा यांच्या मते, येत्या १० दिवसांत पश्चिम राजस्थान वगळून देशाच्या अधिकांश भागांत पाऊस होईल. २०-२१ सप्टेंबर रोजी दिल्लीतही पाऊस होईल. यामुळे थंडीच्या (हिवाळी हंगाम) मोसमाचा खराखुरा अचूक अंदाज आता लावता येणार नाही.
पिकांवरील होणारा परिणाम
मान्सूनच्या शेवटच्या टप्प्यात पाऊस पडला नाही, तर शेतात रब्बीच्या हंगामात पेरणीच्या कालावधीत ओल राहणार नाही. शेतात अधिक पाण्याची आवश्यकता असेल. या कारणामुळे मुख्य गव्हाचे पीक प्रभावित होईल. चणा, बटाटा आणि धान्याच्या पिकांवरही परिणाम होईल.
कमी पाऊसकाळात घडले असे...
२००९ च्या दरम्यान देशभरात सरासरीच्या प्रमाणापेक्षा २१.८ टक्के कमी पाऊस झाला होता. कृषीतज्ञ आर. एस. राणा सांगतात की, त्या वेळी कमोडिटीच्या किमतीही अचानकच वाढ्ल्या होत्या. विशेषत: डाळींचा भाव, तेलाच्या किमतीही वाढल्या होत्या. या वेळेस पेरण्या चांगल्या असल्या तरी कमी पाण्यामुळे प्रति हेक्टर उत्पादन कमी होईल.
डाळींची भाववाढही शक्य
डाळींचे पेरणीक्षेत्र ११ टक्के आणि सोयाबीनचे क्षेत्र सात लाख हेक्टर वाढले आहे, तरीही उत्पादन गेल्या वर्षी जेवढे होते त्यापेक्षा कमीच असणार आहे. आयात डाळंींच्या तुलनेत फार अंतर पडलेले नाही. तरीही भाव दुपटीने वाढले आहेत. मोठ्या व्यापाऱ्यांनी डाळ खरेदी करून त्याचा साठा करून ठेवला आहे. यामुळे भावात तेजी दिसते आहे.
डाळींचे क्षेत्र फक्त २.४८ टक्केच वाढले
जागतिक अन्न संघटनेनुसार, ५८ वर्षांत धान्योत्पादन ३६ टक्के आणि गव्हाचा साठा १६४ टक्के वाढला. १९५७-५८ मध्ये डाळींचे पेरणीक्षेत्र २२५.४ लाख हेक्टर होते, जे २०१४-१५ मध्ये २.४८ टक्के वाढून २३१ लाख हेक्टरवर आले आहे. या कालावधीत उत्पादन ९५.६ लाख टनांवरून वाढून १७२ टनांवर आले आहे. गव्हाचे पेरणीक्षेत्र ११७.३ लाख हेक्टरवरून वाढून ३०९.७ लाख हेक्टरवर पोहोचले आहे.
अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होईल?
ग्रामीण क्षेत्रात टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशीन, दुचाकी, ट्रॅक्टर, वाहने आणि एफएमसीजी उत्पादने आदींच्या मागणीत घट होईल. क्रिसिलचे मुख्य अर्थतज्ञ डी. के. जोशी म्हणतात, खरीप हंगाम खराब गेल्यामुळे भारताच्या विकासदरात ०.५%पर्यंत घट होऊ शकते.