आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • The Efforts Of The Railway Minister Goyal To Increase The Funds For Self Funding

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

स्वबळावर जास्तीत जास्त निधी उभारून खर्च भागवण्याचा रेल्‍वेमंत्री गोयल यांचा संकल्प

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- आगामी अर्थसंकल्पाकडून भारतीय रेल्वेला फार अपेक्षा नाहीत. स्वबळावर जास्तीत जास्त निधी उभारून खर्च भागवण्याचा आमचा प्रयत्न आहे, असा संकल्प रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी केला आहे.  


रेल्वे विभागाच्या कामांसाठी आम्हाला केंद्राच्या निधीची खरे तर गरज वाटत नाही. आमचा खर्च भागवण्यासाठी आम्ही नवनवीन मार्ग शोधून काढण्यावर भर दिला आहे. त्या दिशेने काम सुरू झाले आहे. त्यामुळे अर्थसंकल्पातील तरतुदींकडे आम्ही फार अपेक्षेने पाहत नाहीत, हे मला सांगायला आवडेल, असे गोयल म्हणाले. ते वृत्तसंस्थेशी बोलत होते. अर्थसंकल्पात रेल्वेतील कोणत्या क्षेत्रासाठी निधीची मागणी केली जाईल, या प्रश्नावर गोयल यांनी रेल्वे विभागाची नवीन भूमिका मांडली. प्रवासी सुरक्षा, राजधानी व विकास कामे, स्वच्छता, वित्त आणि खर्चाचा ताळेबंद सुधारणा यावर रेल्वे लक्ष देणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.  

१९२४ पासूनची परंपरा मोडणार  

पुढील वर्षी १ फेब्रुवारी रोजी अरुण जेटली अर्थसंकल्प सादर करतील. त्यांचा हा दुसरा अर्थसंकल्प असेल. त्यात दोन्ही अर्थसंकल्पांचे विलीनीकरण होईल. देश स्वतंत्र झाल्यानंतर पहिल्यांदाच अशा प्रकारचा एक अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. १९२४ पासूनची परंपरा त्यामुळे मोडली जाणार आहे.  

 

वेगवान व सक्षम सेवेवर लक्ष  
आगामी काही दिवसांत रेल्वेची सेवा अधिक सक्षम व वेगवान करण्यावर आम्ही लक्ष केंद्रित करणार आहोत. रेल्वे अंतर्गत अनेक गोष्टींतून निधी उभारणे शक्य आहे. तशा संधी देखील आहेत. त्यामुळे अर्थसंकल्प किंवा इतर निधीची मला मुळीच गरज वाटत नाही. आम्ही हा निधी इतर उभारू, असा विश्वासही गोयल यांनी व्यक्त केला. 


शिक्षण, सार्वजनिक आरोग्यासाठी तरतूद  
रेल्वेसाठी होणारा खर्च वाचवून तो सार्वजनिक आरोग्य सेवा व शिक्षणावर खर्च केला जाणार आहे. अर्थमंत्री अरुण जेटली त्यावर अधिक खर्च करणार आहेत, असे गाेयल यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...