आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ईव्हीएम हॅकॉथॉन चॅलेंज राष्ट्रवादीने स्वीकारले, आपसह इतर राजकीय पक्षांची माघार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - पाच राज्यांतील निवडणुकीत ईव्हीएममध्ये फेरफार केल्याचा आपसह काही पक्षांनी आरोप केल्यानंतर निवडणूक आयोगाने हे यंत्र हॅक करून दाखवण्याचे दिलेले आव्हान राष्ट्रवादी काँग्रेस वगळता एकाही राजकीय पक्षाने पेलले नाही. शुक्रवारी यासाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत या एकाच पक्षाचा आयोगाकडे अर्ज आला.

तीन नावे पाठवली
राष्ट्रवादीने तीन प्रतिनिधींची नावे आयोगाला कळवली. पंजाब, यूपी, उत्तराखंडमधील निवडणुकीत वापरलेल्या कोणत्याही ४ ईव्हीएम आयोगानेच द्याव्यात, असे राष्ट्रवादीने म्हटले आहे.
 
बातम्या आणखी आहेत...