आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 'The Eye Of Golconda' Up For Auction In Hong Kong

गोवळकोंडा हिरा जडवलेल्या नेकलेसचा होणार लिलाव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - गोवळकोंडा हिर्‍यांनी मढवलेल्या नेकलेसचा लिलाव 27 मे रोजी हाँगकाँगमध्ये आयोजित करण्यात आला आहे. सुमारे 10 कोटी डॉलर्स एवढी त्याची अपेक्षित किंमत आहे.
गोवळकोंडा हिर्‍याचा समावेश असलेले हे नेकलेस अत्यंत दुर्मिळ असून त्याचा लिलाव आशियात होऊ घातला आहे. त्याची ‘द आय ऑफ गोलकोंडा ’ अशीही ओळख आहे. 8 कोटी 50 लाख ते 10 कोटी डॉलर्स या दरम्यान या नेकलेसची अपेक्षित किंमत असू शकते. गोवळकोंडा हिर्‍यांचे वर्णन ‘डायमंड्स ऑफ फस्र्ट वॉटर ’ अशा शब्दांतदेखील केले जाते. या हिर्‍यात दिसणारी पारदर्शकता इतर हिर्‍यांमध्ये आढळून येत नाही. त्याची शुद्धता अत्युच्च मानली जाते, असे ‘ख्रिस्टी ’ या कंपनीकडून सांगण्यात आले. भारतातील हिर्‍यांची ओळख पाश्चात्त्य जगाला करून देण्याचे काम फ्रेंच प्रवासी जीन-बाप्टीस टाव्हेर्निअर याने 17 व्या शतकात केले होते.

हिर्‍यांची खाण
हैदराबादजवळील गोवळकोंडा प्रदेश जगात शुद्ध हिर्‍यांची खाण म्हणूनच ओळखला जातो. होप डायमंड, आयडॉल्स आय, कोहिनूर, दर्या इ नूर इत्यादीमुळे प्रदेशाचे नाव जगभरात प्रसिद्ध आहे.
बोलीमध्ये 10 कोटी डॉलर्स अपेक्षित किंमत