आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • The Fire Broke Out On Top Floor Of The Museum Located In FICCI Building In Mandi House

दिल्ली: नॅचरल हिस्ट्री म्यूझियम जळून राख, पर्यावरण मंत्र्यांचे चौकशीचे आदेश

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मंगळवारी पहाटे आग लागली तेव्हा बिल्डिंगमध्ये जास्त लोक नव्हते. - Divya Marathi
मंगळवारी पहाटे आग लागली तेव्हा बिल्डिंगमध्ये जास्त लोक नव्हते.
नवी दिल्ली - राजधानीतील नॅचरल हिस्ट्री म्यूझियमला मंगळवारी पहाटे आग लागली. हे म्यूझियम मंडी हाऊसच्या फिक्की बिल्डिंगमध्ये आहे. पहाटे दोन वाजता येथे आग लागली. आगीत म्यूझियमसह फिक्कीचे ऑडोटोरियम जळाले. घटनास्थळी अग्नीशामक दलाचे 35 बंब पोहोचले आहेत, सकाळी 7 पर्यंत आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.
- मध्यरात्रीनंतर लागलेल्या या आगीवर नियंत्रण मिळवताना अग्निशामक दलाचे 6 जवान जखमी झाले.
- त्यांना राम मनोहर लोहिया हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
- त्यापैकी दोघांची परिस्थिती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.
- जेव्हा आगीची माहिती मिळाली तेव्हा या बिल्डिंगमध्ये फार लोक नव्हते, त्यामुळे मोठी जीवित हानी टळली आहे.
- म्यूझियम मात्र जळून राख झाले.
- 1978 पासून या बिल्डिंगमध्ये हे संग्रहालय होते. येथे नॅचरल हिस्ट्रीशी संबंधित माहिती होती.
पर्यावरण मंत्री जावडेकरांनी दिले तपासाचे आदेश
- पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आगीच्या घटनेला दुर्दैवी म्हटले आहे.
- ते म्हणाले, 'यापुढे अशा घटना होऊ नये यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. आम्ही या आगीच्या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.'
- 'पर्यावरण मंत्रालयांतर्गत चालणारे देशात असे 34 संग्रहालय आहेत. त्यांची सुरक्षा तपासली जाणार आहे.'
- 'संग्रहालयात अनेक महत्त्वाचे दस्तऐवज होते. त्यांचे नुकसान झाले असेल तर मोठी समस्या निर्माण होईल. ते पुन्हा रि-स्टोअर करण्याचा प्रयत्न होत आहे. पुढील एक-दोन दिवसांमध्ये किती नुकसान झाले याची माहिती मिळेल.'

सुरक्षेवर प्रश्न चिन्ह
- मीडिया रिपोर्टनुसार, बिल्डिंगची सेफ्टी मॅनेजमेंट निकामी झालेली होती.
- त्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी एवढा वेळ लागला.
- बिल्डिंगच्या एका भागातून अजूनही धूर निघत, असल्याची माहिती आहे.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, घटनेशी संबंधित फोटो...