आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • The First Batch Of Women Fighter Pilots Will Be Inducted In Air Force On 17th June

वूमन फायटर पायलट्सला आज कमिशन्ड, आव्हानांचा सामना करण्यात तयार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अवनी चतुर्वेदी, मोहना सिंह आणि भावना कांत या देशाच्या पहिल्या महिला फायटर फायलट. - Divya Marathi
अवनी चतुर्वेदी, मोहना सिंह आणि भावना कांत या देशाच्या पहिल्या महिला फायटर फायलट.
नवी दिल्ली - भारतीय हवाई दल आणि तीन जिगरबाज महिला फ्लाइट कॅडेट्स हैदराबादच्या हवाई दल अकादमीत पासिंग आऊट परेडदरम्यान शनिवारी नवा इतिहास घडवणार आहेत. बिहारच्या फ्लाइट कॅडेट भावना कांत, मध्य प्रदेशच्या अवनी चतुर्वेदी आणि राजस्थानच्या मोहना सिंग यशस्वी प्रशिक्षणानंतर भारतीय हवाई दलात पहिल्या महिला लढाऊ पायलट म्हणून कमिशन्ड होतील.

एअरफोर्स चीफ म्हणाले- महिला म्हणून कोणतीही सूट दिली जाणार नाही
- एअरफोर्स चीफ अरुप साहा यांनी आधीच स्पष्ट केले आहे की या तिन्ही पायलट्सला महिला असल्याची कोणतीच सूट मिळणार नाही.
- एअरफोर्सला जिथे गरज असेल तिथे त्यांना तैनात केले जाईल.
- 2017 पासून त्या पूर्णपणे फायटर प्लेन उडवण्यास सज्ज होतील.

ट्रेनिंग एक्सपिरियन्स
- या पायलट्सनी सांगितले, की आतापर्यंतचा प्रवास हा अभूतपूर्व राहिला. या पदापर्यंत पोहोचेल असा कधी विचार केला नव्हता.
- ट्रेनिंग दरम्यान त्यांनी केवळ यशस्वी उड्डाण केले नाही तर अपघात आणि सुरक्षित उड्डाण यांच्यातील अंतरही समजून घेतले. अतिशय जवळून मृत्यू पाहिला.

अवनी चतुर्वेदी - दुसऱ्या उड्डाणाच्या काही क्षण आधी थांबवावे लागले टेकऑफ
>> अवनीने सांगितले, 'दुसऱ्या सोलो फ्लाइंगच्या काही मिनिट आधी मला टेकऑफ रद्द करावे लागले. पहिल्या मार्कर जवळ टेकऑफसाठी रोलिंग सुरु केल्यानंतर कॅनोपी वार्निंग ऐकायला आली.'
>> त्या म्हणाल्या, की सुरुवातीला सूचना विचलित करत होत्या. मात्र कित्येक तासांच्या ट्रेनिंगनंतर आता तसे होत नाही.
>> अवनी यांनी सांगितले, 'पायलट्सला एक सेंकदांपेक्षा कमीवेळात निर्णय घ्यायचा असतो.'
>> दुसऱ्या फ्लाइंग दरम्यानच्या कॅनोपी वॉर्निंगमुळे मला शंका आली होती, की आपण टेकऑफला एबोर्टिंग डिले तर केला नाही, किंवा ओपन कॅनोपीमध्ये हवा तर घुसली नाही. हे धोकादायक ठरले असते.
पुढील स्लाइडमध्ये वाचा, हवाई दलाने कोणता सल्ला दिला...
बातम्या आणखी आहेत...