आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • The Initial Investigation Can Return The Part Of The Team Officials Sunanda Pushkar Case

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सुनंदा पुष्कर प्रकरणी हटवण्यात आलेले तपास अधिकारी पुन्हा पथकात दाखल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली : सुनंदा पुष्कर प्रकरणात सुरुवातीला तपास पथकाचा भाग राहिलेल्या अधिकाऱ्यास पुन्हा एकदा या प्रक्रियेत समाविष्ट करण्यात येणार आहे. तपास करणाऱ्या पोलिस निरीक्षकाला दिल्ली पोलिसांत पुन्हा पाठवण्यात आले होते. त्यांना पुन्हा एसआयटीमध्ये पाचारण करण्यात आले आहे.
अधिकाऱ्यास अशा प्रकारे पुन्हा तपास पथकात समाविष्ट करण्यात येणार असल्याची शिफारस करण्यात आली आहे. परंतु त्याबाबतचा आदेश मात्र मिळालेला नाही. तपासाचा अहवाल तयार करणारे एसआयटी अधिकारी म्हणाले, गेल्या काही दिवसांत झालेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांमुळे अनेक अडचणी आल्या आहेत. तपास पथकाने कॅनडाच्या न्याय विभागाकडे सुनंदा व त्यांचे पती काँग्रेस नेते शशी थरूर यांच्यातील संभाषणाचा तपशील मागितला होता. यासंबंधीची माहिती डिलिट झाली होती. त्याचा दस्तऐवज पुन्हा मिळवण्यासाठी लवकरच एक टीम रवाना होऊ शकते.
गेल्या महिन्यात आयपीएल फ्रँचायझी कोचीचा दस्तऐवजदेखील मागवण्यात आला आहे. ५१ वर्षीय सुनंदा १७ जानेवारी २०१४ रोजी सितारा हॉटेलमध्ये मृतावस्थेत आढळून आल्या होत्या. एक दिवस अगोदर त्यांचा ट्विटरवरून पाकिस्तानी पत्रकार मेहर तरार यांच्याशी भांडण झाले होते. या प्रकरणी पोलिसांनी शशी थरूर यांच्याशी चर्चा केली होती आणि सहा लोकांची पॉलिग्राफिक चाचणीदेखील करण्यात आली होती. पुष्कर प्रकरणाची चर्चा पाकिस्तानातही झाली.
बातम्या आणखी आहेत...