आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • The Man Behind Chacha Chaudhury And Other Characters Cartoonist Pran Dies

चाचा चौधरी, साबू, बिल्‍लू, पिंकी,चिन्नी चाचीसारख्या व्यंगचित्ररेखांमधील \'प्राण\' हरपला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- 'चाचा चौधरी', 'साबू', 'बिल्लू', 'पिंकी', 'श्रीमतीजी' आणि 'चिन्नी चाची' यांसारखे कार्टून रेखाटणारे कार्टूनिस्ट प्राण कुमार शर्मा यांचे निधन झाले. ते 75 वर्षांचे होते. गुडगाव येथे मंगळवारी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास प्राण यांची प्राणज्योत मालवली. आपल्या लोकप्रिय कार्टून्सच्या माध्यमातून प्राण घरा-घरात पोहोचले होते.

प्राण यांचा जन्म 15 ऑगस्ट, 1938 रोजी लाहोरपासून जवळ असलेल्या कसूर येथे झाला. फाळणीनंतर त्यांचे कुटूंबिय ग्वाल्हेर येथे स्थलांतरीत झाले. 'मास्टर ऑफ आर्ट'चे (पदवीधर) शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी मुंबईतील जेजे स्कूल ऑफ फाइन आर्ट्समध्ये चार वर्षांचा डिप्लोमा केला.

प्राण यांनी 'कार्टूनिस्ट' म्हणून 1960 मध्ये दिल्लीत करियर सुरु केले. वृत्तपत्र 'मिलाप'मध्ये पहिल्यांदा 'डब्बू जी' नावाने कार्टून मालिका सुरु केली. ही मालिका खूप लोकप्रिय ठरली. 1969 मध्ये प्राण यांनी पहिल्यादा हिंदी मॅगझीन 'लोट-पोट'च्या माध्यमातून संपूर्ण जगाला 'चाचा चौधरी' या व्यंगव्यक्तीरेखेची ओळख करून दिली. त्यानंतर प्राण यांचे चाचा चौधरी घरा-घरात पोहोचले.

प्राण यांना 2001 मध्ये 'इंडियन इंस्टिट्यूट ऑफ कार्टूनिस्ट'तर्फे लाइफटाइम अचिव्हमेंट अवॉर्डने सन्मानित करण्‍यात आले. यापूर्वी 1995 मध्ये प्राण यांच्या सगळ्यात लोकप्रिय कॉमिक्स व्यंगव्यक्तीरेखेला लिम्का बुक ऑफ रिकॉर्डमध्ये स्थान मिळाले होते.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा, अखेरच्या श्वासापर्यंत सक्रीय होते प्राण...
(फाइल फोटोः कार्टूनिस्ट प्राण)