आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

12 जुलैपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन, शेतक-यांच्‍या आंदोलनावरुन खंडाजंगी होण्‍याची शक्‍यता

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - संसदेचे पावसाळी अधिवेशन १२ जुलैपासून सुरू होणार आहे. शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर विविध राज्यांत सुरू असलेल्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर या अधिवेशनात सरकार विरुद्ध विरोधी पक्षाची खडाजंगी उडण्याची चिन्हे आहेत.
 
जम्मू-काश्मीरमध्ये चिघळलेल्या परिस्थितीवरही विरोधक सरकारला चांगलेच घेरण्याची चिन्हे आहेत. उच्चपदस्थ सूत्रांनुसार, संसदीय प्रकरणांच्या कॅबिनेट समितीपुढे सादर केलेल्या प्रस्तावानुसार संसदेचे पावसाळी अधिवेशन १२ जुलैपासून सुरू होऊन ११ ऑगस्टला त्याचा समारोप होणार आहे.
बातम्या आणखी आहेत...