आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवे शिक्षणधोरण बनविण्यासाठी नव्या समितीची घोषणा लवकरच

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली :सरकारने नव्या राष्ट्रीय शिक्षणधोरणाचा मसुदा तयार करण्यासाठी आणखीन एक समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. मनुष्यबळ साधन संपत्ती विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले की प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञांच्या अध्यक्षतेत समितीची घोषणा पुढील दहा दिवसांत केली जाऊ शकते.
यापूर्वी माजी कॅबिनेट सचिव टीएसआर सुब्रमण्यन यांच्या नेतृत्वातील समितीने नव्या राष्ट्रीय शिक्षण नीतीसंबंधीचा मसुदा सरकारला दिला आहे.जावडेकर यांनी म्हटले आहे की, नव्या समितीत काही नावांवर चर्चा सुरू आहे; पण त्याचीही सहमती घ्यावी लागेल.
कारण की त्यांना तीन ते चार महिन्यांपर्यंत काम करावे लागेल. त्यांनी सांगितले की, राज्य, शिक्षणतज्ज्ञ, संस्थांसारख्या सर्व पक्षांशी विस्तृत चर्चा केली गेली आहे. सुब्रमण्यन समितीच्या शिफारशींनाही लक्षात ठेवले जाईल. समितीकडे कागदपत्रे तयार करण्याचे काम दिले गेले नव्हते.
बातम्या आणखी आहेत...