आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्लीच्या कंपनीने बनवली पोर्टेबल पॅथलॅब, रक्त व लघवीच्या सर्व चाचण्या 91 रुपयांत होणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - पॅथॉलॉजीमध्ये रक्त व लघवीच्या सर्व चाचण्या करण्यासाठी सध्या जवळपास ३ हजार रुपयांचा खर्च येतो. मात्र, आता त्यासाठी एवढे पैसे मोजण्याची आवश्यकता भासणार नाही. दिल्लीच्या एका कंपनीने ब्रीफकेसच्या आकारातील पोर्टेबल पॅथलॅब विकसित केली आहे. याच्या माध्यमातून रक्त व लघवीशी संबंधित ७६ चाचण्या केल्या जाऊ शकतील. यासाठी केवळ ९१ रुपये खर्च येईल. एम्स, लष्कर, आयटीबीपी व काही राज्यांतील सरकारी रुग्णालयांत याची चाचणी झाली आहे.

पॅथलॅबच्या निष्कर्षात सामान्य प्रयोगशाळेच्या  तुलनेत ३% पेक्षाही कमी फरक आला आहे. विशेष म्हणजे या पॅथलॅबचे निष्कर्ष त्वरित येतात. याशिवाय अहवाल केबल किंवा ब्लूटूथ अथवा मोबाइलमध्येही पाठवला जाऊ शकतो. पॅथलॅब १२ व्होल्टची बॅटरी किंवा सोलार सेलनेही चालवली जाऊ शकते. याची निर्मिती करणाऱ्या कंपनीस मार्गदर्शनासह आर्थिक मदत जैव तंत्रज्ञान विभागाची संस्था बायोटेक्नॉलॉजी इंडस्ट्री रिसर्च असिस्टंट काैन्सिलने केली आहे. व्यवस्थापकीय संचालक रेणू स्वरूप म्हणाल्या, सर्वात मोठे संशोधन एक्यूकाइन नावाचे अॅनालायझर आहे.

याच्या माध्यमातून ३२ बायोकेमेस्ट्री व ५ हिमेटोलॉजी निकषांद्वारे २ सेकंदांत निष्कर्ष मिळतील. ते शून्य ते ५० अंश सेल्सियसमध्ये काम करू शकते. सॅम्पलसाठी केवळ ०.५ मिलिलिटर रक्त लागते. पेटीमध्ये अॅनालायझरसोबत सेंट्रिफ्यूज, इन्क्यूबेटर, डेटा रेकॉर्डर व मिनी लॅपटॉप असतो. या पेटीसोबत ईसीजी किट, सिरोलॉजी किट, युरोलॉजी किट, बीपी मशीन बाइकवर फिट करून ‘लॅबाइक’ विकसित केली आहे. भारतीय लष्करात याचा सध्या उपयोग केला जात आहे.

पोर्टेबल लॅबमध्ये या चाचण्या होऊ शकतात
साखर, लिपिड प्रोफाइल, एलएफटी, केएफटी, हिमेटॉलॉजी व सिरोलॉजी ब्लड टेस्ट, युरिन टेस्ट, ईसीजीचा समावेश आहे.

अर्भकांना गुदमरण्यापासून वाचवेल नियोब्रिद
दरवर्षी जगातील ८ लाख अर्भके जन्मावेळी श्वास गुदमरल्यामुळे मृत्युमुखी पडतात. मुलाला सीपीआर व तोंडातून ऑक्सिजन दिला जातो. यावर उपाय म्हणून नियोब्रिद तयार केले आहे. यामध्ये पायाने पॅडल दाबून अर्भकास पाइपने ऑक्सिजन दिला जातो.

सायंटिग्लोत ५ रुपयांत कळेल युरिनमधील प्रोटीनचे प्रमाण
लघवीतील प्रोटीनचे प्रमाण कळण्यासाठी सायंटिग्लो नावाचे उपकरण तयार केेले आहे. सध्या डिपस्टिक चाचणीचा खर्च प्रति चाचणी ७५ रुपयांपर्यंत येतो. सायंटिग्लोत खर्च ५ रुपये येईल.
बातम्या आणखी आहेत...