आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • The Price Of Jet Fuel Hiked But Non Subsidised Gas Cylinder Price Declined

विना अनुदानित गॅस सिलेंडर 53 रूपयांनी स्वस्त, जेट फ्यूल महागले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- विना अनुदानित गॅस सिलेंडरच्या दरात 53 रुपयांनी घट झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत गॅसच्या किंमती उतरल्याने तेल कंपन्यांनी हा निर्णय घेतला आहे. असे असले तरी जेट फ्यूल म्हणजेच ATF (Aviation Turbine Fuel)च्या दरात 1 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे.
विना अनुदानित गॅसच्या किंमतीमध्ये दोन महिन्यांपूर्वी 220 रुपये अशी भरमसाठ वाढ करण्यात आली होती. त्यावेळी एका सिलेंडरसाठी 1241 रुपये मोजावे लागत होते. त्यानंतर एक फेब्रुवारी रोजी विना अनुदानित गॅस सिलेंडरच्या दरात 107 रुपयांने कपात करण्यात आली होती, तर आता 53 रूपयांनी घट करण्यात आली आहे. त्यामुळे विना अनुदानित सिलेंडरची किंमत 1134 रूपयांवरून 1080 (दिल्ली) रूपये इतकी झाली आहे.
इंडियन ऑयल कॉर्पोरेशनच्या माहितीनुसार, एलपीजीवर होणारे नुकसान पहिल्यापेक्षा कमी झाले आहे. फेब्रुवारीत हे नुकसान 656 रूपये प्रति सिलेंडर एवढे होते. ते आता घटून 605 रूपयांवर आले आहे. जानेवारीत हेच नुकसान 762 रूपये इतके होते. आता गॅस सिलेंडरचे दर कमी होत असल्याने महागाईने होरपळत चाललेल्या सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
पुढे वाचा, दिल्ली आणि मुंबईतील जेट फ्यूलचे दर...