आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खासगी क्षेत्रात आरक्षण देण्याचा प्रस्ताव नाही; केंद्रीय मंत्री थावरचंद गहलोत यांची माहिती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- खासगी क्षेत्रात अनुसूचित जाती, जमाती व ओबीसींसाठी आरक्षणाचा कोणताही प्रस्ताव नाही. तथापि, यासाठी वातावरण निर्मितीचे प्रयत्न केले जात असल्याचे केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गहलोत यांनी शनिवारी सांगितले.  

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकाेत्तर जयंती वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमांची माहिती देताना गहलोत म्हणाले, सरकार मागास व वंचितांच्या शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक सक्षमीकरणाचे प्रयत्न करत आहे. यासाठी विविध मंत्रालये व विभागांच्या माध्यमातून अनेक कार्यक्रम व योजना राबवल्या जात आहेत. ओबीसी आरक्षण क्रीमिलेअरचा आढावा दर तिसऱ्या वर्षी करण्याची तरतूद आहे. तथापि, ओबीसी आयोगाला घटनात्मक दर्जा मिळवून देण्याची प्रक्रिया सुरू आहे. या संदर्भातील विधेयक लोकसभेत पारित झाले आहे. राज्यसभेत ते प्रवर समितीकडे पाठवले आहे.
बातम्या आणखी आहेत...