आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National News In Marathi sonia Gandhi News In Marathi.

सोनिया गांधींना गर्भश्रीमंतांच्या यादीतून वगळले, \'हफिंग्टन पोस्ट\'चा माफीनामा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - अमेरिकन वेबसाइट हफिंग्टन पोस्टने जगातील 20 श्रीमंत राजकारण्यांच्या यादीतून काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी याचे नाव काढले आहे. सोनिया गांधी यांचे नाव श्रीमंत राजकारण्याचा यादीत आल्याने राजकीय वर्तूळात एकच चर्चा सुरू झाली होती. श्रीमती गांधी यांचे नाव यादीतून काढल्यानंतर हफिंग्टन पोस्टच्या संपादकांनी म्हटले आहे की, सोनिया गांधी यांच्या संपत्तीबद्दल आम्हाला पूर्ण माहिती मिळालेली नाही.
सोनिया गांधी यांच्या नावावरून वादंग निर्माण झाल्यानंतर वेबसाइटने त्यांचे नाव वगळले असले तरी, या वादावर पडदा पडलेला नाही. सोशल मीडियावर प्रश्न उपस्थित केला जात आहे की, वेबसाइटने त्यांच्या यादीतून सोनिया गांधींना का वगळले? वेबसाइटवर दबाव वाढला होता का?
vemana @curryputtar ने ट्विट केले आहे, 'हफिंग्टन पोस्टने रिच क्लबमधून सोनियांचे नाव का वगळले. याला फॅसिझम नाही तर काय म्हणायचे. मलाही कळेनासे झाले आहे.'
Mahidhar Katti @mahikatti ने ट्विटरवर म्हटले आहे, की 'हफिंग्टन पोस्टने सोनिया गांधीचे नाव यादीतून का काढले. तथ्यहिन संशोधन की दबावामुळे त्यांना असे करावे लागले'

भाजप नेते सुब्रम्हण्यम स्वामींनी ट्विट केले आहे की, यासाठी मी स्वतः शोध घेतला आहे. 1991 मध्ये सोनिया गांधी यांची संपत्ती 2 अब्ज डॉलर होती. 2011 मध्ये त्यात वाढ झाली असून 4 अब्ज डॉलरवर पोहोचली आहे.
TM@xtahzy ने ट्विट केले आहे, 'हफिंग्टन पोस्टने श्रीमंत राजकीय नेत्यांच्या यादीतून सोनिया गांधी यांचे नाव वगळल्याने,'त्यांचे संपूर्ण जगावर नियंत्रण आहे' या रामदेव बाबांच्या दाव्याशी मी सहमत आहे. '
पुढील स्लाइडमध्ये वाचा, हफिंग्टन पोस्टचा माफीनामा,

जगातील 10 श्रीमंत राजकारणी, राजे, सुलतान