आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इंटरनेटमध्ये भेदभाव नको, प्रत्येक वेबसाइटवर मिळणार समान गती; ट्रायच्या शिफारशी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- दूरसंचार नियामक ट्रायने मंगळवारी इंटरनेटच्या समान अधिकारावर (नेट न्यूट्रॅलिटी) शिफारशी दिल्या आहेत. यात इंटरनेटला एक ओपन प्लॅटफॉर्म देण्याचे धोरण कायम ठेवण्यात आले आहे. सेवा देणाऱ्या कंपन्या इंटरनेट सुविधांमध्ये कोणाबरोबर भेदभाव करू शकत नाहीत. एखादे अॅप, वेबसाइट किंवा सेवा ब्लॉक करता येणार नाही किंवा एखाद्यास इतरांपेक्षा जास्त गती (स्पीड) देता येणार नाही. विशेष प्रकारच्या अत्यावश्यक सेवेसाठी जास्त स्पीड हवी असेल, तर तेथे सवलत मिळेल.  


५५ पानांच्या शिफारशीमध्ये नियामकाने नेट न्यूट्रॅलिटीसाठी परवान्याच्या अटीमध्ये दुरुस्ती करण्याची शिफारस केली आहे. सेवा देणाऱ्या कंपन्या भेदभाव करून सेवेमध्ये कोणासोबतच तडजोडीही करू शकत नाहीत. माहिती देणाऱ्या नेटवर्कला यामध्ये ट्रायने सवलत दिली आहे. यामुळे भारती एअरटेल आणि रिलायन्स जिओला फायदा होणार असल्याचे ब्रोकिंग संस्था अॅडेलव्हाइजने म्हटले आहे. या कंपन्या आधीपासूनच ही सेवा देत आहेत.  


इंटरनेट सेवा खुली आणि सर्वांपर्यंत पोहोचणे आवश्यक असल्याचे ट्रायचे अध्यक्ष आर. एस. शर्मा यांनी म्हटले आहे. कल्पकता, स्टार्टअप्स, ऑनलाइन व्यवहार आणि सरकारी अॅप्स यासाठी हे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. मात्र, नियमांचे उल्लंघन झाल्यास दंड लावण्याची शिफारस करण्यात आलेली नाही. परवाना देताना घालण्यात आलेल्या अटींचे उल्लंघन झाल्यास लावण्यात येणारा दंड यासाठीदेखील लागू राहील, असेही शर्मा यांनी सांगितले. 

 

देखरेखीठी विशेष समिती 

देखरेख करणे व नियमांचे उल्लंघन झाल्यास तपासासाठी समिती स्थापन करण्याची शिफारस करण्यात आली. यात दूरसंचार ऑपरेटर, इंटरनेट सेवा प्रदाता, माहिती प्रदाता, संशोधन संस्था, नागरिक संघटना व ग्राहक मंचचा पदाधिकारी असेल.  

 

अमेरिका - युरोपातही नेट न्यूट्रॅलिटी 

उत्तर आणि द. अमेरिका, युरोप व जपानमध्ये असा नियम लागू असल्याचे जागतिक नेट न्यूट्रॅलिटी कोअलिशनने म्हटले अाहे. चीन व रशियात असा कायदा नाही. पाकिस्तान, नायजेरिया अणि दक्षिण आफ्रिकेत यावर विचार सुरू आहे. 

 

पुढील स्‍लाइडवर वाचा,‘इंटरनेट ऑफ थिंग्ज’वर लागू होईल नवीन धोरण...

बातम्या आणखी आहेत...