आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तामिळनाडूला पाणी सोडले का, मंगळवार दुपारपर्यंत माहिती द्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - आम्ही ३० सप्टेंबरला निर्देश दिल्यानुसार तामिळनाडूला पाणी सोडले आहे का याची माहिती मंगळवार दुपारपर्यंत द्यावी, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी कर्नाटक सरकारला दिले.

कावेरी पाणी व्यवस्थापन मंडळ मंगळवारपर्यंत स्थापन करावे, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिले होते. या आदेशात दुरुस्तीसाठी केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. केंद्र सरकारची बाजू मांडताना अॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी म्हणाले की, या मुद्द्यावरील मुख्य दिवाणी अपील अजूनही प्रलंबित असल्याने मंडळ स्थापन करावे, असे केंद्र सरकारला सांगण्याची गरज नव्हती. मंडळ स्थापन करण्याचे काम कार्यकारी मंडळाच्या अखत्यारीत असते.

न्यायमूर्ती दीपक मिश्रा आणि सी. नागप्पन यांच्या खंडपीठाने केंद्र सरकारच्या या अंतरिम अर्जावरील सुनावणी मंगळवारी ठेवली. तसेच तामिळनाडूला पाणी सोडावे या ३० सप्टेंबरच्या आदेशाची अंमलबजावणी झाली आहे का, याचा अहवाल मंगळवारी दुपारी २ वाजेपर्यंत द्यावा, असा आदेश कर्नाटक सरकारला दिला.

कर्नाटकने १ ते ६ ऑक्टोबरदरम्यान दररोज ६ हजार क्युसेक पाणी तामिळनाडूला सोडावे, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने ३० सप्टेंबरला दिला होता. आदेशाची अंमलबजावणी न झाल्यास तुमच्यावर कायद्याचा बडगा उगारला जाईल, असा गंभीर इशाराही न्यायालयाने कर्नाटक सरकारला दिला होता. त्याचप्रमाणे कावेरी पाणी व्यवस्थापन मंडळ त्वरित स्थापन करावे, असे निर्देश केंद्र सरकारला दिले होते. मंडळ स्थापन झाल्यावर त्याची समिती कावेरी खोऱ्याला भेट देऊन वस्तुस्थिती जाणून घेऊन अहवाल देईल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले होते.
बातम्या आणखी आहेत...