आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वर्षभरात 100 श्रीमंतांची संपत्ती 26% वाढली; मुकेश अंबानींची संपत्ती सर्वाधिक 67% वाढली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- वर्षभरापासून आर्थिक डामडौल डळमळीत असला तरी देशातील बड्या श्रीमंतांच्या संपत्तीत वाढ झाली आहे. फोर्ब्ज मासिकानुसार, एका वर्षात भारतातील १०० सर्वात श्रीमंत  लोकांची संपत्ती २६% वाढली आहे. वर्षभरापूर्वी त्यांची संपत्ती २४.३१ लाख कोटी रुपये होती. आता ती ३१.१३ लाख कोटी रुपये झाली आहे. हा आकडा देशाच्या जीडीपीच्या सुमारे २०% आहे. यापैकी टॉप १० ची एकूण संपत्ती  ११.१४ लाख कोटी रुपये आहे. ही शंभर श्रीमंतांच्या संपत्तीच्या ३६%  आहे. रिलायन्सचे चेअरमन मुकेश अंबानी सतत दहाव्या वर्षी पहिल्या क्रमांकावर आहेत. त्यांची संपत्ती २.४७ लाख कोटी आहे. ही गेल्यावर्षीपेक्षा ६७% (९९,४५० कोटी रु.) जास्त आहे. सर्वाधिक वाढ त्यांचीच आहे. 

देशाचे आर्थिक आकडे मात्र यापेक्षा अगदी विपरित
- विकास दर : आरबीआयने विकासदराचा अंदाज ७.३ वरून ६.७% केला. एप्रिल-जूनमध्ये हा ३ वर्षांत सर्वात कमी ५.७% होता.
- औद्योगिक उत्पादन : १२ महिन्यांत औद्योगिक उत्पादनात ३.२९% वाढ झाली. फेब्रुवारीत केवळ १.९% वाढ झाली होती. जूनमध्ये ०.२% घसरणही आली होती.
- कोअर सेक्टर : यात ३.३७% विकासदर आहे. फेब्रुवारीत कोअर सेक्टरचे उत्पादन केवळ ०.६% व जूनमध्ये ०.८% वाढले होते.
- बँक कर्ज : बँकांच्या कर्जात केवळ ५.१% वाढ. ही ६० वर्षांत सर्वांत कमी आहे.
 
पुढील स्‍लाईडवर पहा, शंभर श्रीमंतांच्या संपत्तीपैकी २२.५% टॉप-५ लोकांकडे
बातम्या आणखी आहेत...