आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंतप्रधान म्हणाले, डॉ. आंबेडकरांनी देशाला संविधानाच्या रुपात अमृत दिले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी राज्यसभा व लोकसभेत संविधानावर चर्चा सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेला संबोधित करत आहे. पंतप्रधानांचे भाषण सुरु होण्याआधी विरोधकांचा संसंदेत प्रचंड गदारोळ केला. सत्ताधार्‍यांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
भारताची राज्यघटना ही जगातील सर्वात मोठी राज्यघटना आहे. त्यामुळे संसदेत सगळ्यांचे सहकार्य अपेक्षीत असल्याची भावना नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात व्यक्त केल्या. संविधानात बदल करण्याविषयी कुणी विचारही करू शकत नाही. तशा अफवा पसरवल्या जात आहेत. संविधान बदलने म्हणजे आत्महत्या करण्यासारखेच असल्याचे नरेंद्र मोदी यांनी सांगितले.पंतप्रधान मोदी आपल्या भाषणात म्हणाले, देशाला मिळालेल्या संविधानाचा जितका गौरव करावा तितका तो कमीच आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर किती व्यापक विचारसरणीचे होते, हे संविधानातून आजही कायम जाणवते. देशाला एकसंध ठेवण्यात संविधानाचे मोठ योगदान आहे. भारतासारख्या देशाचे संविधान बनविणे म्हणजे फारच कठीण काम होते. कारण आपला देश राजे-महाराजांनी नव्हे, तर सामान्य जनतेने उभा केला आहे. त्यामुळे संविधान लोकांपर्यंत नेण्यासाठी स्पर्धा, परीक्षा, कार्यक्रम असे उपक्रम आपल्याला राबवता येतील.

डॉ.आंबेडकरांनी आयुष्यभर समाजाचा अपमान, अवहेलना सहन केली. मात्र, संविधानात त्यांनी कधीही सूडाची भावना येऊ दिली नाही. त्यांनी अपमानाचे विष पचवून घेतले आणि देशाला संविधानाच्या रुपात अमृत दिल्याचे मोदींनी सांगितले.

देशासाठी 26 नोव्हेंबर हा एक ऐतिहासिक दिवस ठरला आहे. यादिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाची निर्मिती केली होती. डॉ.आंबेडकरांनी देशाला संविधानाच्या रुपात अमृत दिले आहे. देश हा सत्ताधिका-यांनी बनविला नसून देशातील करोडो जनतेने बनविल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.

आपला देश विविधतेने नटलेला आहे. देशात अनेक धर्माचे लोक राहातात. आस्तिक-नास्तिक एकत्र नांदतात, अशा स्थितीत संविधान तयार करणे खूप आव्हानात्मक होते. मात्र, डॉ. आंबेडकरांनी हे आव्हान यशस्वीरित्या पेलले. संविधान बनविताना जर डॉ.आंबेडकर नसते तर 'संविधान' सामाजिक दस्ताऐवज होऊच शकले नसते, अशा शब्दात पंतप्रधानांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा गौरव केला.

दरम्यान,केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी शुक्रवारी सकाळी चर्चेला सुरुवात केली. ते म्हणाले, 'सरकारचा कोणताही धर्म नसतो. सरकार संविधानानुसार चालते. असहिष्णूतेच्या मुद्यावर ओरडणा-यांना आणीबाणीचा विसर पडला काय? असा उटल सवाल देखील जेटलींचा काँग्रेसला केला.

देशातील वातावरण सध्या सहिष्णु आणि असहिष्णु मुद्याने ढवळून निघाले आहे. जेटलींचे वक्तव्य देखील या मुद्यांशी जोडून पाहिले जात आहे. जेव्हा जेटली संविधानवर बोलत होते, तेव्हा पंतप्रधान मोदी सभागृहात होते. भारतीय संविधानाला 65 वर्षे पूर्ण झाल्यानिमीत्त केंद्र सरकारने संसदेच्या दोन्ही सभागृहात संविधानावर दोन दिवसांची चर्चा ठेवली आहे. गुरुवारी यावर लोकसभेत चर्चा झाली आणि शुक्रवारी राज्यसभेत चर्चा सुरु आहे. जेटलींनंतर काँग्रेस नेते गुलामनबी आझाद बोलत होते.

पुढील स्लाइडवर वाचा, जेटलींनी साधला काँग्रेस-सोनिया गांधीवर निशाणा