आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगभरातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या टॉप 10 अॅक्ट्रेसच्या यादीतून दीपिका बाहेर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - सर्वाधिक कमाई करणाऱ्या पहिल्या 10 अॅक्ट्रेसच्या यादीतून दीपिका पादुकोण बाहेर पडली आहे. फोर्ब्सने प्रसिद्ध केलेल्या जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या अॅक्ट्रेसच्या गेल्या वर्षीच्या यादीत दीपिका 10व्या क्रमांकावर होती. हा मान मिळवणारी ती पहिली भारतीय अभिनेत्री ठरली होती. यंदा फोर्ब्सच्या यादीत 2.6 कोटी डॉलर (166 कोटी रुपये) कमाईसह हॉलिवूड अॅक्ट्रेस एमा स्टोन प्रथम क्रमांकावर आहे. बेस्ट फिल्मचा ऑस्कर पटकावणाऱ्या ला ला लँडमधील तिच्या अभिनयासाठी जगभरात तिचे कौतूक झाले होते. 
 
दीपिका पहिली इंडियन अॅक्ट्रेस 
- गेल्या वर्षीच्या फोर्ब्सच्या यादीत दीपिकाने 10 वा क्रमांक पटकावला होता. या यादीत पहिल्या दहात स्थान मिळवणारी ती पहिली भारतीय अभिनेत्री ठरली होती. 
- त्यावर दीपिकाने म्हटले होते, की 'बाजीराव मस्तानी' आणि 'पीकू' ने केलेल्या शानदार कमाईमुळे या यादीत स्थान मिळाले आहे. 
 
ला ला लँडला 14 ऑस्कर नामांकन 
- एमा स्टोनची फिल्म ला ला लँड ने जगभरात 44.5 कोटी डॉलरची कमाई केली होती. या चित्रपटाला 14 ऑस्कर नामांकन मिळाले होते. 
- जेंडर इक्वॅलिटीसाठी एमा आवाज उठवत आली आहे. तिच्या या मागणीमुळे तिच्यासोबत काम करणाऱ्या मेल स्टार्सच्या मानधनात कपात करण्यात आली होती. 
 
जेनिफर लॉरेंन्स तिसऱ्या क्रमांकावर 
- गेल्यावर्षी पहिल्या क्रमांकावर राहिलेली जेनिफर लॉरेंन्स यंदा दोन पायऱ्या खाली येत तिसऱ्या क्रमांकावर राहिली आहे. 
बातम्या आणखी आहेत...