आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Then On The Next Army Chief VK Singh Suhag Direct Accused Killer Of Innocents, Told Depredator

लष्करप्रमुखांबाबत भाजप-सरकारमध्ये मतभिन्नता, सिंह यांच्या राजीनाम्याची मागणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - देशाचे नवे लष्कप्रमुख म्हणून लेफ्टनंट जनरल दलबीर सुहाग यांच्या नियुक्तीवरून चांगलेच राजकारण तापायला सुरुवात झाली आहे. माजी लष्करप्रमुख आणि विद्यमान परराष्ट्र राज्यमंक्षी व्हीके सिंह यांनी सुहाग यांचे प्रमोशन थांबवण्याचा आपला निर्णय योग्य असल्याचे म्हटले आहे. तर विरोधकांनी व्हीके सिंह यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तर सरकारने स्पष्ट केले आहे की, दलबीर सिंह यांच्या नियुक्तीचा निर्णय अंतिम असून तो बदलला जाणार नाही.
भाजप व सरकारमध्ये मतभिन्नता
सुहाग यांच्या प्रकरणी भाजपमध्ये वेगवेगळे सूर कानी पडत आहेत. व्हीके सिंह यांच्याबरोबरच आता पक्षाचे वरिष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनीही सुहाग यांच्या नियुक्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. या नियुक्तीवर पुनर्विचार करण्याची मागणी स्वामी यांनी केली आहे.
आता बदल नाही, सरकारचे स्पष्टीकरण
सरकारने मात्र सुहाग यांच्या नियुक्तीबाबत पुनर्विचार करण्याचा मुद्दा फेटाळला आहे. हा निर्णय अंतिम असून हे पद वादांपासून दूर ठेवणे गरजेचे असल्याचे संरक्षण मंत्री अरुण जेटली यांनी स्पष्ट केले. गेल्या महिन्यात जेटली यांनी पद सांभाळले होते, त्याचवेळी त्यांनी स्पष्ट केले होते की, नवीन सरकारला सुहाग यांच्या नियुक्तीवर आक्षेप नाही. तसेच नवे लष्करप्रमुख तेच असतील असे त्यांनी सांगितले होते. भाजपचा आक्षेप घाईत निर्णय घेण्यावर होता, कोणत्याही नावावर नव्हे असे, त्यांनी सांगितले होते.
व्हीके सिंह अधिक संतापले
व्हीके सिंह यांचा पारा अधिकच चढला असून त्यांनी सुहाग यांना 'बेगुनाहों का हत्यारा' आणि 'लूटपाट करने वाला' म्हणून संबोधले आहे. सिंह यांनी ट्वीटरवर सुहाग यांचे प्रमोशन थांबवण्याचा आपला निर्णय योग्य होता, असेही म्हटले आहे. त्यांनी केलेले पोस्ट असे -
''If unit kills innocents, does dacoity and then head of organization tries to protect them, should he not be blamed? Criminals should go free!!''

संरक्षण मंत्रालयाने मंगळवारी आपल्याच सरकारमधील एका मंत्र्यासाठी अडचणीची परिस्थिती निर्माण केली होती. सरकारने सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र दाखल करून दलबीर सिंह सुहाग यांचे प्रमोशन योग्य असल्याचे सांगितले होते. तसेच माजी लष्करप्रमुख व्हीके सिंह यांनी थांबवलेले प्रमोशन योग्य नसल्याचेही म्हटले होते.

फाइल फोटो: परराष्ट्र राज्यमंत्री व्हीके सिंह