आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • There Is No System In Kedarnath Or Badrinath To Measure Or Forecast Rain And Flood

...तर काय लाखोंच्या संख्येत आहे मृतांचा आकडा? रहस्यच राहाणार केदारनाथाचा प्रलय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उत्तराखंडमधील केदारनाथ येथे नेमके काय झाले होते याची माहिती कदाचित कधीच उघड होऊ शकणार नाही, अशी शक्यता आहे. केदारनाथ आणि आसपासच्या परिसरात 16 आणि 17 जून रोजी किती पाऊस झाला ज्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात जनजीवन उद्धवस्त झाले, याची आकडेवारीच भारतीय हवामान खात्याकडे नाही. हवामान खाते या भागातील पावसाची नोंद घेत नाही, त्यामुळे तेथील माहिती त्यांच्याकडे नाही.

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (एनडीएमए)चे उपाध्यक्ष एम. शशिधर रेड्डी यांचे म्हणणे आहे की, केदारनाथ आणि आसपासच्या परिसरात किती पाऊस झाला आणि तिथे काय-काय आणि किती उद्धवस्त झाले याची माहिती त्यांच्याकडे नाही. शशिधर रेड्डी उपाध्यक्ष असलेल्या या प्राधिकरणाचे चेअरमन पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग आहेत. रेड्डींचे म्हणणे आहे की, आता तेथील नुकासानाचा अंदाज केवळ शास्त्रज्ञच लावू शकतात.

एवढेच नाही तर, सरकार उत्तराखंडातील प्रलयात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्याही फार जास्त नसल्याचे भासवत आहेत. या राज्यात पर्यटनासाठी साधारण तीन लाख लोक येत असतात. चार धाम यात्रा या पर्वतीयराज्यातील पर्यटनासाठीचा चांगला काळ मानला जातो. सरकारने आतापर्यंत मरणा-यांची संख्या हजारातच सांगितली आहे, त्यावर राज्य सराकरमधील नेत्यांचेही एकमत नाही. राज्याचे मुख्यमंत्री विजय बहुगुणा यांनी तर म्हटले आहे की, या प्रलयातील मृतांचा आकडे कळणे अवघड आहे.