आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • There Was An ‘LTTE Mole’ In Rajiv Gandhi’s Home, Claims RD Pradhan`s Book

राजीव गांधी यांच्या घरात वावरत होता लिट्टेचा हेर; लीक केली होती महत्त्वपूर्ण माहिती!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांच्या एका निकटवर्तीयाने आपल्या पुस्तकात एक खळबळजनक खुलासा केला आहे. राजीव गांधी यांच्या घरात लिट्टेचा हेर वावरत होता. राजीव गांधी यांच्या हत्येपूर्वी त्याने महत्त्वपूर्ण माहितीही लीक केली होती. याबाबत सोनिया गांधी यांना संशय होता, असा दावा पुस्तकाचे लेखक आर.डी.प्रधान यांनी केला आहे.
'10 जनपथवर लिट्टेच्या एका हेराने आश्रय घेतला होता. या काळात अनेक संशयित हेरांनी पोलिसांनी अटक केली होती, असा खुलासा प्रधान यांनी 'माय इयर्स विद राजीव अँड सोनिया' या पुस्तकात केला आहे. वर्मा आणि जैन आयोगाने केलेल्या चौकशीत हा मुद्दा समोर येण्याची शक्यता होती. परंतु, सत्य बाहेर येऊ नये, यासाठी कदाचित त्यांना आदेशही देण्यात आला असावा, असेही प्रधान यांनी म्हटले आहे.
10, जनपथ येथूनच राजीव गांधी यांच्या हत्येचा कट रचला जात होता. 10 जनपथ येथील महत्त्वपूर्ण माहिती हेरांच्या माध्यमातून लिट्टेपर्यंत पोहोचवली जात होती. सोनिया गांधी याबाबत सजग होत्या, परंतु 1991 मध्ये लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी त्या अमेठीत होत्या. याच काळात तमिळनाडूमध्ये राजीव गांधी यांची हत्या झाली होती. जस्टिस वर्मा आयोगने राजीव गांधी यांच्या सुरक्षेत झालेल्या निष्काळीपणाची चौकशी केली होती. परंतु तेव्हाही हा खुलासा झाला नसल्याचे प्रधान यांनी म्हटले आहे.

पुढील स्लाइड्‍सवर याचा, राजीव गांधी यांची हत्या रोखता आली असती?
(संग्रहीत छायाचित्र- राजीव गांधी आणि सोनिया गांधी)