नवी दिल्ली- जुन्या नोटा बदलून देण्याची अाणखी एक संधी देण्यास केंद्र सरकारने नकार दिला आहे. सुप्रीम कोर्टात दिलेल्या शपथपत्रात केंद्राने म्हटले की, आता ५०० आणि १००० च्या जुन्या नोटा बदलण्याची संधी दिल्यास काळ्या पैशावर लगाम लावण्यासाठी केलेली नोटाबंदी निरुपयोगी ठरेल. याबाबतच्या याचिकांना दिलेल्या उत्तरात सरकारने म्हटले की, नोटा बदलण्याची संधी दिल्यास बेनामी व्यवहार आणि इतरांच्या नावाने नाेटा जमा करण्याचे प्रकार वाढतील. यामुळे खऱ्याखोट्याचा तपास करणे सरकारी यंत्रणांना अवघड होऊन बसेल. १९७८ मधील नोटाबंदीत जुन्या नोटा जमा करण्यासाठी सरकारने केवळ सहा दिवस दिले होते. आमच्या सरकारने ५१ दिवस दिले.