आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • These Are Some Interesting Facts Related To Taj Mahal

Heritage Week: इंग्रजांनी विकला होता ताजमहल, भारतीय व्‍यापाऱ्याने केली खरेदी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आग्रा - यमुना नदी किनारी वसलेल्या आग्रा शहरात प्रेमाचे प्रतीक असलेले 'ताजमहल' हे प्रसिद्ध ऐतिहासिक स्मारक आहे. त्‍याला पाहण्‍यासाठी जगभरातून येथे रोज हजारो पयर्टक येतात. मात्र, या महलाच्‍या अनेक अशा गोष्‍टी आहेत की ज्‍या तुम्‍हाला माहिती नाहीत. 19 ते 25 नाव्‍हेंबरदरम्‍यान जगभर पयर्टन सप्‍ताह साजरा केला जात आहे. त्‍या अनुषंगाने divyamarathi.com सांगणार आहे जगातील सात आश्‍चर्यामध्‍ये समाविष्‍ट असलेल्‍या ताजमहलाबाबतच्‍या तुम्‍ही कधी न ऐकलेल्‍या, वाचलेली रंजक माहिती...
लढाऊ विमानांपासून वाचण्‍यासाठी ताज महलाला झाकले होते
दुसऱ्या महायुद्धाच्‍या काळात ब्रिटनच्‍या शत्रूराष्‍ट्रांकडून ताजमहलाला धोका होता. त्‍यामुळे लढाऊ विमानांना ही ऐतिहासिक वास्‍तू दिसू नये, यासाठी ब्रिटेनने अमेरिकन सैन्‍याच्‍या मदतीने ताज महलला बांस आणि लाकडाच्‍या साहाय्याने पूर्णपणे झाकले होते. यातून जापान आणि जर्मनीच्‍या लढाऊ विमानांच्‍या डोळ्यात धूळफेक करण्‍याचा प्रयत्‍न करण्‍यात आला होता. या संबंधीचे छायाचित्र आजही भारतीय पुरातत्‍व सर्वेक्षण (एएसआय)च्‍या आग्रा सर्कल ऑफिसमधील लायब्ररीमध्‍ये आहे.
मिळाली होती गुप्‍त माहिती
जपान आणि जर्मनीकडून ताज महलावर हल्‍ला केला जाणार आहे, अशी गुप्‍त माहिती मित्र देश अमेरिका आणि ब्रिटेन यांना मिळाली होती. नंतर तत्‍काळ ताज महलाला झाकण्‍यात आले.
1971 मध्‍ये हिरव्‍या कापडाने झाकला
भारताला स्‍वातंत्र मिळाल्‍यानंतर भारत-पाकिस्‍तान युद्धाच्‍या काळात वर्ष 1971 मध्‍ये ताज महलपासून 10 किमी अंतरार पाक सैनिकांनी बॉम्‍ब वर्षाव केला होता. त्‍यामुळे ताजमहलाला हिरव्‍या कपड्याने झाकले होते. पाकिस्‍तानी विमानांना ताज महलाऐवजी हिरवळ दिसावी, या मागचा उद्देश होता. पण, त्‍याचे छायाचित्र उपलब्‍ध नाही.

पुढील स्लाइड्सवर वाचा, इंग्रजांनी सात लाख रुपयांना विकला होता ताजमहल