आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • They Alway Complaining, Its Know Only God Siddhu

दिव्य मराठी विशेष: सितम करते हैं वो, खुदा जाने वजह क्या है - सिद्धू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - अमृतसरचे खासदार नवज्योतसिंग सिद्धू यांनी आपल्या पक्षातील काही नेते व पंजाब सरकारच्या वर्तनावर कठोर भाषेत टीका केली आहे. क्रिकेटच्या मैदानावरील एकेकाळचे सलामीवीर सिद्धू यांनी ‘दिव्य मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत स्वकीयांविरुद्धच जोरदार फटकेबाजी केली. पंजाबमध्ये भाजपचा एकुलता एक खासदार असतानाही मला कायम डावलले जात आहे. किंबहुना माझे अस्तित्व मिटवण्यासाठी राजकारण केले जात आहे. पंजाबमध्ये अकाली दलासोबत आमची युती आहे, परंतु युतीचे प्रतिबिंब सरकारच्या वर्तनातून दिसून यायला हवे, असे त्यांनी सुनावले.


@पंजाबमध्ये अकाली दल-बीजेपीचे सरकार असूनही तुमचे कोणी ऐकायला तयार नाही?
> येथे माझी स्थिती विनापंखाच्या चिमणीप्रमाणे झाली आहे. आमचेच सरकार असूनही जनतेसाठी तयार करण्यात आलेल्या योजनांची मला अंमलबजावणी करणे जमेनासे झाले आहे.
@सुखबीर बादल यांच्याशी संघर्ष होतोय का ?
> सुखबीर बादल मोठ्या भावाप्रमाणे आहेत. बंधुभाव असावा. परंतु येथे पक्षपातीपणा होत आहे. अमृतसरच्या विकासासाठी तयार करण्यात आलेल्या प्रकल्पांत राज्य सरकार अडथळा आणू लागले आहे. पाच वर्षांपासून बस आणायच्या होत्या, त्या आणू दिल्या नाहीत. क्रीडा अकादमीमध्येदेखील खोडा घातला. हे सगळे असे सुरू आहे. येथे सिद्धू शेर म्हणतात, ‘उन्हें ये फिक्र हरदम नई तरजे जफा क्या है, हमें भी शौक देखें सितम की इंतहा क्या है, गुनहगारों में शामिल है गुनाहों से नहीं वाकिफ सितम करते हैं वो खुदा जाने वजह क्या है..’
@ तुमच्याच पक्षाचे लोक अडसर ठरू लागलेत ना ?
> राजकारणात लोक मला धोकादायक समजतात. माझ्यावरून त्यांच्या मनात असुरक्षिततेची भावना आहे. चार वेळा निवडणूक जिंकली. पाचव्या वेळा जिंकलो तर फार आश्चर्य नाही. त्यामुळे माझी उंची वाढेल, अशी भीती त्यांना वाटत असावी.
@ असे का होत आहे ?
> माझे अस्तित्व मिटवण्याचा प्रयत्न केला जात आहे. असे लोक एकत्र आले तर मला पर्वा नाही. ‘बौना फिर बौना चाहे पर्वत के शिखर पर खडा हो, देवता फिर देवता है चाहे कुएं की गहराई में पडा हो...’
@ तुमचे मतदारसंघात दर्शन होत नसल्याची नेहमी तक्रार होते. त्यावर काय सांगाल ?
> सत्याची प्रतारणा होऊ शकते, परंतु ते पराभूत होत नाही. शहरातील हिरवाई वाढवण्यासाठी सव्वा कोटी रुपये खर्च करणारा मी देशातील एकुलता एक खासदार असेल. तीन वर्षे पतियाळाला गेलो नाही. सास-यांचे निधन झाले तरी गेलो नव्हतो.
@ आता काय ठरवले आहे ?
> राजकारण माझा प्रोफेशन नाही. मिशन आहे. मिशन पूर्ण करेल. लोकांसाठी मी आमच्याच सरकारच्या विरोधात न्यायालयातदेखील गेलो आहे. गुरूंची नगरी चांगली व्हावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तेच सकारात्मकपणे करत राहणार.