आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नरेंद्र मोदींच्या व्यक्तीमत्त्वातील 10 प्रमुख गुण, जग जिंकण्याची गुरुकिल्ली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज ख-या अर्थाने एक ब्रँड म्हणून समोर आले आहेत. देशातील सर्वोच्च पदापर्यंत पोहचण्याचा त्यांचा प्रवास थक्क करून सोडणारा आहे. मोदींनी अनेक वर्षांपूर्वी हा ब्रँड तयार करण्याची कवायत सुरू केली होती. त्यावेळी गुजरातशिवाय एखादेच असे राज्य असेल, जेथे या दाढीवाल्या नेत्याचे चाहते असतील. पण आजची परिस्थिती वेगळी आहे. पण हे एका रात्रीत घडलेले नाही. अनेक वर्षांची अथक मेहनत, नियोजनबद्ध रणनिती आणि तगडा जनसंपर्क या जोरावर मोदींनी आपली ही प्रतिमा तयार करण्यात यश मिळवले.
आज मोदींचा प्रभाव नाही असा कदाचितच कोणी असेल. स्तुती असो किंवा टीका काहीही झाले तरी त्यांना कोणी टाळत नाही हे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यांना विरोध करण्यासाठीही विरोधकांना जय्यत तयारी करावी लागत असते. त्यामुळे मोदी विरोधकांनाही आपल्या कामाबाबत अधिकाधिक माहिती मिळवण्यात व्यस्त ठेवत असतात.

मोदींच्या या अष्टपैलू व्यक्त्तीमत्त्वाकडून अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. मोदींकडून शिकता येतील अशाच काही चांगल्या गोष्टींची माहिती घेऊयात पुढील स्लाइड्सवर...