आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नवी दिल्ली - तिस-या आघाडीचे सरकार देशात सत्तेवर येणाची शक्यता काँग्रेस व भाजपने सपशेल फेटाळून लावली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसने धर्मनिरपेक्ष पक्षांच्या एकत्रीकरणावर भर दिला आहे. सपाचे प्रमुख मुलायमसिंह यादव यांनी रविवारी सातारा येथे तिस-या आघाडीची गरज बोलून दाखवली होती.
केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री मनीष तिवारी म्हणाले, तिसरी किंवा चौथी आघाडी केवळ मृगजळ आहे. इतिहास हेच सांगतो. काँग्रेस नेते दिग्विजयसिंग यांनीही यादव यांच्या वक्तव्यात नावीन्य नसल्याचे म्हटले. काही प्रादेशिक पक्ष फक्त सत्तेसाठी राजकारण करतात, असे ते म्हणाले. भाजप नेते बलबीर पुंज यांनी तिस-या किंवा चौथ्या आघाडीने सरकार येण्याची सुतराम शक्यता नसल्याचे म्हटले आहे. जदयू नेते देवेश ठाकूर यांनी सध्या आघाडीचा काळ असल्याचे म्हटले आहे.
दरम्यान, भाजपसोबत हातमिळवणीची शक्यता नसल्याचे सपाचे सरचिटणीस रामगोपाल यादव यांनी म्हटले आहे.
एनडीए किंवा भाजप नेत्यांच्या स्तुतीस राजकीय दृष्टीने पाहिले जाऊ नये. स्तुतीचा अर्थ आम्ही त्यांच्यासोबत आघाडी करत आहोत, असा नाही.
बिजद, जयांचे स्वागत : राष्ट्रवादी
संभाव्य आघाडीमुळे धर्मनिरपेक्ष पक्ष एकत्र येतील. यूपीए व्यापक व्हावी, असे वाटते. बिजू जनता दल व अण्णाद्रमुकनेही यूपीएत यावे, असे आवाहन करताना राष्ट्रवादी काँगे्रसचे प्रवक्ते डी.पी. त्रिपाठी यांनी मुलायम यांचे अप्रत्यक्ष समर्थन केले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.