आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तिसर्‍या आघाडीसाठी ही योग्य वेळ :देवेगौडा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तिरूवनंतपुरम
काँग्रेसकडून राहुल गांधी असतील किंवा भाजपकडून नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान पदासाठी पुढे केले जात असले तरी दोन्ही पक्षांना बहुमत मिळणार नाही. त्यामुळे वेगळा पर्याय अर्थात तिसर्‍या आघाडीसाठी हीच योग्य वेळ असल्याचे जनता दलाचे (संयुक्त) नेते एच.डी. देवेगौडा यांनी म्हटले आहे.
काँग्रेस व भाजपच्या विरोधात तिसर्‍या आघाडीचा पर्याय एकत्र येण्यासाठी ही अतिशय योग्यवेळ आहे. सध्याच्या परिस्थितीत पंतप्रधान पदाचा उमेदवार ही काही समस्या नाही. धोरणे आणि कार्यक्रम आपल्यासाठी महत्त्वाची आहेत, असे गौडा म्हणाले. गौडा रविवारी पत्रकारांशी बोलत होते. अलीकडे दिल्ली विधानसभेसाठी झालेल्या निवडणुकीतील निकाल अतिशय महत्त्वाचा आहे. सरकार संदर्भात आम आदमी पार्टीने निर्णय घ्यायचा आहे. तिसर्‍या आघाडीत सामील होण्याबाबतही पक्षाने ठरवावे असे ते म्हणाले.