आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • This Is A Conspiracy, BJP Trying To Hurt My Image: Pramod Muthalik

श्रीराम सेनेचे मुतालिक यांचे भाजप नेत्यांना अल्टिमेटम; पक्षात परत घ्या, नाही तर...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - कर्नाटकातील वादग्रस्त नेते आणि कट्टर हिंदूत्ववादी संघटना श्रीराम सेनेचे प्रमुख प्रमोद मुतालिक यांचा राजकारणाच्या मुख्य प्रवाहात येण्याचा मार्ग कठीण झाला आहे. मुतालिक यांनी रविवारी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर झालेल्या विरोधामुळे, काही वेळातच त्यांचे प्राथमिक सदस्यत्व रद्द करण्यात आले होते. त्यांच्यासोबत त्यांचे सहकारी दिनाकर शेट्टी यांची देखील फजिती झाली होती. मुतालिक भाजपमध्ये तर, दिनाकर शेट्टी काँग्रेसमध्ये दाखल झाले होते. मात्र, मुतालिक यांच्यावरुन वाद सुरु झाल्यानंतर काँग्रेसने शेट्टींनाही बाहेरचा रस्ता दाखविला होता.
भाजपने काही तासांमध्येच पलटी मारल्यामुळे मुतालिक संतप्त झाले आहेत. आज (मंगळवार) त्यांनी भाजपला धमकीच दिली आहे. भाजपने पुन्हा प्रवेश दिला नाही तर, बेळगाव, चिक्कोडी, धारवाड आणि बगलकोट येथून भाजपविरोधात उमेदवार उभे करणार असल्याचे ते म्हणाले. मुतालिक यांनी हिंदू मतविभागणीची भीती भाजपला दाखविली आहे.
योग्य उत्तर देऊ
मुतालिक यांनी त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यामागे षडयंत्र असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले, 'माझ्या विरोधात षडयंत्र रचण्यात आले. भाजपमधीलच काही नेते माझी प्रतिमा मलिन करु इच्छीत आहेत. त्यांना स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणून घ्यायचे आहे. त्यामुळे अल्पसख्यांकांची मते मिळतील असा त्यांचा अंदाज आहे. मात्र, आम्ही अशा काही लोकांपुढे झुकणार नाही. त्यांना योग्य उत्तर दिले जाईल. '
श्रीराम सेनेचे काम सुरु राहाणार
मुतालिक म्हणाले, श्रीराम सेना हिंदुत्वाच्या रक्षणाचे काम करते. फॅशनच्या नावाखाली हिंदू संस्कृतीचा -हास थांबवण्याचे काम आम्ही करतो. आम्ही शांततेच्या मार्गाने आमचा विरोध मांडत असतो. आम्ही कोणतीही राजकीय विचारधारा मान्य केली तरी, आमचे काम सुरुच राहाणार.

पुढील स्लाइडमध्ये, 'मला का काढून टाकले हे भाजपने सांगितले नाही'