आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही आहे आम आदमीची ताकद...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘आप’चा शपथविधी आज
मेट्रो रेल्वेने रामलीलावर येणार केजरीवाल
आज दिल्लीत असे घडेल
० केजरीवाल 6 मंत्री व आमदारांसह शनिवारी सकाळी 10.30 वाजता कौशांबी येथून मेट्रो रेल्वेने रामलीला मैदानासाठी रवाना होतील.
० शपथविधी सोहळा दुपारी 12 वाजता होईल. कोणत्याही व्हीआयपीला पास दिलेले नाहीत. खुद्द केजरीवाल कुटुंब सर्वसामान्यांसारखेच रामलीला मैदानावर येईल.
० सोहळ्यानंतर केजरीवाल छोटेसे भाषण देतील. यात आपल्या प्राधान्यक्रमांची घोषणा ते करू शकतात. यानंतर ते सचिवालयाच्या वरिष्ठ अधिका-यांना भेटतील.
० सायंकाळी कॅबिनेटची बैठक होऊ शकते. यानंतर केजरीवाल 700 लिटर मोफत पाण्याची घोषणा करू शकतात. वीज मीटरच्या तपासणीचेही आदेश देऊ शकतात.
28 तारीख...काँग्रेसच्या स्थापनादिनीच ‘आप’चे सत्तारोहण
‘आप’चे नेते 28 ला शपथ घेतील... पक्षाने 28 जागा जिंकल्या... बरोबर 128 वर्षांपूर्वी 28 डिसेंबरलाच काँग्रेसची स्थापना झाली होती.
राहुल गांधी म्हणाले
लोकपालच्या धर्तीवर आता लोकायुक्त
पुढील वर्षी 28 फेब्रुवारीपर्यंत काँग्रेसशासित सर्व राज्यांत लोकपालच्या धर्तीवर लोकायुक्त नेमला जाईल. -राहुल गांधी (काँग्रेस मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतरची पत्रपरिषद)